नवीन नांदेड – महाराष्ट्र राज्याचे पोलीस उपमहासंचालक मधुकर पांडे यांची नांदेड जिल्हा दोन दिवशीय दौऱ्या दरम्यान नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यास दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी करून सखोल माहिती घेतली व सदरील माहिती बाबत समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस उपमहासंचालक यांचा दोन दिवसीय नांदेड दौरा होता या दौऱ्या दरम्यान त्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे येथील सर्व दस्तऐवजाची पाहणी करून विविध गुन्ह्याची व कामकाजाची चौकशी करण्यात आली. यावेळी येथील विविध प्रकारच्या कामकाजाची माहिती ही समाधानकारक आढळून आली व तसेच ठाण्याचा परिसर देखील सुशोभीकरणासह स्वच्छ असल्याने उपमहासंचालक त्यांनी एकंदरीत सर्वच कामकाजावर समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी राज्याचे उपमहासंचालक मधुकर पांडे यांना पुष्पगुच्छ देऊन येतोचित सत्कार करण्यात आला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव ,सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश नाईक, वसंत मुळे, रेखा काळे, गुन्हे शाखेचे पोउपनि व्यंकट कुसमे यांच्यासह ग्रामीण ठाण्यातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची उपस्थिती होती.























