नायगांव – दसरा आणि दिवाळी सणानिमित्त नरसी येथील ७/१२ मेन्स वेअरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑफर धमाका’ या बंपर योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या योजनेतील भाग्यवान विजेत्यांचा बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.भाजपाचे नेते तथा श्री तुळजा भवानी जिनिंग फ्रेड्रेशनचे चेअरमन श्रावण भिलवंडे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक स्कूटीचे प्रथम पारितोषिक विजेते गणेश उमाकांत यादलवाड यांना स्कूटी प्रदान करण्यात आली.
२१९९ रुपयांच्या कापड खरेदी योजनेतून गणेश उमाकांत यादलवाड यांनी इलेक्ट्रिक स्कूटी जिंकली. तर ११९९ रुपयांच्या खरेदी योजनेतून गंगाधर समुद्रे (सावळी), हणमंत दत्ता निमलवाड (रुद्रपूर), अविनाश सिरसे (सुगाव), मारोती डोईवाड (कोपरा), शंकर मुदले (बेटमोगरा), कपिल कुऱ्हाडे (धनोरा), रितेश वाघमारे (रुई), आदित्य पाटील (चिंचाळ), गणेश बसवदे (काटकळंबा), गणेश जाधव (पिंपळदरी) आणि विजय पाटील (चोंडी) या अकरा ग्राहकांनी सायकल जिंकली.
तसेच ४९९ रुपयांच्या खरेदी योजनेतून मोहन मारुती (मांजरम), हरिदास गायकवाड (सावरखेड), श्रीकांत नागनाथ (गडगा), आदित्य अभिजीत, अमोल नगर (बिलोली), भुजंगा बक्केवाड, विकास उत्तम वाघमारे आणि रोहित खरकाडे (बिलोली) या आठ ग्राहकांची मिक्सर बक्षिसासाठी निवड करण्यात आली. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
यावेळी भाजपाचे नेते तथा श्री तुळजाभवानी जिनिंग फेडरेशनचे नूतन चेअरमन श्रावण भिलवंडे यांनी ७/१२ मेन्स वेअरचे संचालक सोमेश शेटकर आणि स्वप्निल शेटकर यांचे कौतुक केले. ग्राहकांनी दाखविलेला विश्वास, प्रेम आणि भरघोस प्रतिसाद यामुळेच ‘ऑफर धमाका’ योजना यशस्वी ठरली. आपल्यासारखे हसत मुख आणि आपुलकीचे ग्राहक लाभणे हेच संचालकांचे मोठे यश आहे. ग्राहकांचे समाधान आणि त्यांच्याशी निर्माण झालेले जिव्हाळ्याचे नाते हेच व्यवसायाचे खरे भांडवल आहे. यापुढेही ग्राहकांची अशीच सेवा करण्याची संधी मिळो, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी सर्व ग्राहकांना दीपावली आणि आगामी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे, माणिक लोहगावे, भास्कर भिलवंडे, मारोती भिलवंडे, मराठी पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष गंगाधर भिलवंडे, नरसीचे माजी सरपंच व्यंकटराव कोकणे, पत्रकार संघाचे नायगांव तालुकापाध्यक्ष गोविंदराव टोकलवाड, पत्रकार आनंदराव सूर्यवंशी, दिलीप वाघमारे, शाम चोंडे यांच्या सह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि असंख्य ग्राहक उपस्थित होते.
यावेळी संचालक सोमेश शेटकर आणि स्वप्निल शेटकर यांनी ग्राहकांचे आभार मानले. ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास हीच आमची खरी ताकद असून भविष्यातही दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न राहील. ग्राहकांची अशीच साथ मिळाल्यास आगामी काळात ७/१२ मेन्स वेअरच्या आणखी नवीन शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे सोमेश शेटकर यांनी सांगितले.
कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवर, ग्राहक आणि विजेत्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेटकर सर यांनी केले तर सोमेश शेटकर यांनी आभार मानले. ग्राहकांशी विश्वासा चे नाते जपत राबविलेल्या या उपक्रमाचे नरसीसह पंचक्रोशीतील ग्राहकांकडून कौतुक होत आहे.






















