सोलापूर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 19 संचालक मंडळ सदस्यांपैकी तब्बल 18 जागावर भाजप प्रणित पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे. तर एका जागेवर अर्जुनसिंह मोहिते पाटील हे स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या उमेदवाराला विजय मिळवता आलाय. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने मुसंडी मारत 9 पैकी 8 जागेवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर अवघ्या एका जागेवर मोहिते पाटील प्रणित स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला यश मिळवता आले.
शेवटच्या टप्प्यात फक्त एका जागेवर भाजप आणि मोहिते पाटील गटात मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र त्यातही भाजपचे उमेदवार मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा पराभव करत भाजपची एकहाती सत्ता राखली.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांपैकी 10 जागा भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने आधीच बिनविरोध जिंकल्या आहेत. या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती.
चौकट
निवडणून आलेले हे आहेत उमेदवार
1) बाबासाहेब देशमुख : (सांगोला वि. सो.)
2) अर्चना घाडगे : (महिला)
3) शामल बागल : (महिला)
4) राजेंद्र बंदीछोडे : (इतर भटक्या जा.)
5) रणजितसिंह शिंदे : (कृषी व प्रक्रिया)
6) मनीष देशमुख : (बँक व पतसंस्था)
7) सूर्यादित्य साळुंखे : (दुग्ध विकास)
8) महादेव कांबळे : (अनुसूचित जाती)
आणि मोहिते पाटील पॅनल (एकूण – 1)
19) अर्जुनसिंह मोहिते पाटील(माळशिरस सोसायटी)
चौकट
हे आहेत बिनविरोध झालेले उमेदवार
1) राजेंद्र राऊत : बार्शी वि. सोसा.
2) प्रशांत परिचारक : पंढरपूर वि. सोसा.
3) विक्रांत (बाळराजे) पाटील : मोहोळ वि. सोसा.
4) सिद्धेश्वर आवताडे : मंगळवेढा वि. सोसा.
5) यशराज शिंदे : माढा वि. सोसा.
6) श्रीदीप हसापुरे : दक्षिण सोलापूर वि. सोसा.
7) पृथ्वीराज माने : उत्तर सोलापूर वि. सोसा.
8) शंभूराजे जगताप : करमाळा वि. सोसा.
9) सचिन कल्याणशेट्टी : अक्कलकोट वि. सोसा.
10) अजिंक्यराणा पाटील : ओबीसी
चौकट
अशी आहेत मतदासंघानुसार मिळालेली मते
१) माळशिरस सोसायटी मतदारसंघ
एकूण मतदान – १४१
बाद मते -१
अर्जुनसिंह मोहिते पाटील – ८३ (विजयी)
बाबाराजे देशमुख – ३३
ज्ञानराज पाटील – २४
२) सांगोला सोसायटी मतदारसंघ
एकूण मतदान – ८०
बाद मते – ५
आमदार बाबासाहेब देशमुख – ८० (विजयी)
संजय इंगोले – १५
३) नागरी बँका व पतसंस्था
एकूण मतदान – ६०२
बाद मते – ५९८
मनीष देशमुख – ३१२ (विजयी)
अमोल शिंदे – २८३
श्रीधर कोंडले – ३
राजेंद्र गंगदे – ०
४) कृषी पणन आणि शेतमाल प्रक्रिया संस्था
एकूण मतदान – १०९
बाद मते – १
रणजीत शिंदे – ७९ (विजयी)
संग्रामसिंह जहागिरदार – २९
५) दुग्ध संस्था / व्यक्तिगत सभासद
एकूण मतदान – ३०५
बाद मते – ३
सूर्यदित्य साळुंखे – १९४ (विजयी)
शिवाजी पाटील – १०८
६) महिला मतदारसंघ
एकूण मतदान – २२५७
बाद मते – २३
शामल बागल – १३४८ (विजयी)
अर्चना घाडगे – १३०७ (विजयी)
सिंधू पाटील – ७२१
अस्मिता गायकवाड – ७५९
रुक्मिणी रणदिवे – ६
नीता गुंड – ४
७) विमुक्त जाती / भटक्या जमाती
एकूण मतदान – २२५६
बाद मते – २१
राजेंद्र बंदीछोडे – १२९२ (विजयी)
अनिकेत देशमुख – ९३२
श्रीधर कोंडले – १२
८) अनुसूचित जाती जमाती
एकूण मतदान – २२५६
बाद मते – २०
महादेव कांबळे – १४३८ (विजयी)
दत्तात्रय खडतरे – ७९८






















