बार्शी – बार्शी-सोलापूर महामार्गावर पानगावाजवळ गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास महिंद्रा थार गाडीचा भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणान्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक बसल्यानंतर थार गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या अपघातात ओंकार गजानन पैलवान (वय २३, रा. जुळे सोलापूर) या तरुणाचा मूत्यू झाला, तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश बहादूर भोसले (वय १८), वैभव बाबुराव जाधव (वय २१) आणि समर्थ बाबुराव जाधव (वय २४, सर्व रा. राघवेंद्रनगर, मजरेवाडी, होटगी रोड, सोलापूर) हे बाळे टोलनाक्याजवळ असताना ओंकार पैलवान आणि समर्थ जाधव हे महिंद्रा थार गाडीसह तेथे आले. त्यांनंतर सर्वजण बार्शीकडे जाण्यसाठी थार गाडीतून निघाले. ओंकार पैलवान हा गाडी चालवत होता, तर समर्थ जाधव त्याच्या बाजूला बसला होता. मागील सीटवर ऋषिकेश भोसले आणि वैभव जाधव बसले होते. वैराग मार्गे बार्शीकडे येत असताना पानगावपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर समोर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली जात होता. थार चालकाने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरुन इटिंगा कार आल्याने चालकाने गाडी पुन्हा ट्रॅक्टरच्या मागे घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी थार गाडीची ट्रॉलीच्या चाकाला धडक बसली.
धडकानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण त्याचा सुटल्याने थार गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या अपघातात ओंकार पैलवान याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. समर्थ जाधव याच्या डोक्याला दुखापत झाली, तर वैभव जाधव याच्या डाव्या हाताला व डोक्याला गंभीर मार लागला. ऋषिकेश भोसले यालाही किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातातील जखमींना रुप्णवाहिकेद्वारे बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे सोलापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी ऋषिकेश बहादूर भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसारपोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.