मंगळवेढा – हाजापुर परिसरात अंगावर काटा आणणारी घटना घडली आसुन ऐका २६ वर्षीय विवाहीत महिलेला तिच्या आन्य तिन लेकरासह आज्ञाताने पळवुन नेले आहे. पतीच्या फिर्यादीवरून आज्ञात व्यक्तीविरूध्द पाेलीसात गून्हा दाखल झाला आहे.
पाेलीस सुत्रांनी दिलेली माहीती आशी फिर्यादी पती व पत्नी,तसेच मुल दि. 28 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता यांच्यासोबत जेवण केले आणि झोपले हाेते.
रात्री बारा वाजता पतीला जाग आली. शेजारी पाहिलं तर… कोणीच नाही पतीन घरभर शोधलं, आजूबाजूला पाहिलं, तसेच नातेवाईकाकडे शाेध घेतला मिळून आले नाहीत
पतीने पोलीसात जाण्याआधी स्वतः 20 दिवस वेड्यासारखा शोध घेतला. कुठे भांडण होऊन गेली असेल? पण नाही. शेवटी त्याची खात्री पटली कोणीतरी अज्ञात इसमानं माझ्या बायको पोरांना पळवून नेलंय अखेर दि. 17 ऑक्टोबर रोजी तो धावत मंगळवेढा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.मंगळवेढा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.