Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माजी महापौर महेश कोठे, प्रथमेश कोठे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 11, 2024
in solapur
0
माजी महापौर महेश कोठे, प्रथमेश कोठे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
0
SHARES
118
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विकास कामांच्या श्रेयावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात श्रेयवादावरून झालेला वाद चांगलाच पेटला आहे. या हाणामारीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्यासह पाच जणांवर सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणीसोलापूर शहर भाजपचे कार्यकारिणी सदस्य सतीश कलप्पा भरमशेट्टी (रा. सरवदे नगर, जुना विडी घरकुल, मुळेगाव रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

महेश कोठे, प्रथमेश कोठे, शाबीर कुर्ले,जावळे सर,विठ्ठल कोटा यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.दं.वि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४१, १४३, १४७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सोलापूरच्या पूर्व भागातील विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिर ते राज इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंतच्या डांबरी रस्त्याच्या उद्‌घाटनावरून कोठे आणि देशमुख समर्थक भाजपचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात हाणामारी झाली होती. हाणामारीच्या घटनेनंतर आमदार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख आणि महेश कोठे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडले होते.

 

भरमशेट्टी यांनी रस्त्याच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमास देशमुख यांना का निमंत्रित केले म्हणून महेश कोठे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले आणि जावळे सर यांनी जमाव जमवून लोखंडी वस्तूंनी मारहाण केली. भांडण सोडविण्यास आलेल्या माझ्या पत्नीलाही लागले आहे, असे भरमशेट्टी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र, पोलिसांनी आमची फिर्याद घेतली नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने आमची फिर्याद त्यांनी घेतली नाही, असा आरोप महेश कोठे यांनी केला. आमच्याच कार्यक्रमात येऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या सत्तेचा गैरवापर सुरू आहे. पोलिसांनी आमची बाजू समजून घ्यावी आणि आमचीही फिर्याद घ्यावी, यासाठी आम्ही पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी भेटणार आहे, असेही महेश कोठे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगितले.

Post Views: 90
Previous Post

सतत पक्ष बदलत आलेले लक्ष्मण ढोबळे हे ‘ पलटूराम’ “जिकडे जाऊ तिकडे खाऊ”

Next Post

अक्कलकोट रोडवरील गांधीनगर इथल्या प्लास्टिक चिकटपट्टी कारखान्याला भीषण आग

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अक्कलकोट रोडवरील गांधीनगर इथल्या प्लास्टिक चिकटपट्टी कारखान्याला भीषण आग

अक्कलकोट रोडवरील गांधीनगर इथल्या प्लास्टिक चिकटपट्टी कारखान्याला भीषण आग

ताज्या बातम्या

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी १४ जूनला ऑनलाईन योग सत्र

June 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

June 13, 2026
जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

 जिल्हा परिषदेत ९९ केंद्रप्रमुखांचे समायोजन शिक्षण व्यवस्थेला नवे बळ

June 13, 2026
टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

June 13, 2026
पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

June 13, 2026

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907179

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697