सोलापूर – डिझाइन क्षेत्रातील देशातील सर्वोच्च संस्था मानल्या जाणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ (NIFT) प्रवेश परीक्षेत सोलापूरच्या ‘बीआरडीएस’ (BRDS) संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यशाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेत संस्थेच्या २० पैकी तब्बल १८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत दुसऱ्या टप्प्यातील ‘सिच्युएशन टेस्ट’साठी (Situation Test) आपली निवड निश्चित केली आहे.
या परीक्षेत श्रावणी अंबुरे, स्मृती जाजू, दिविजा भानप, समीक्षा मोटगी, आरुषी राचेती, श्रेया कोरे, तेजस्विनी देशमुख, सौम्या कोल्हापुरे, साई कुलकर्णी, साक्षी हिंदोळे, प्रसन्न बडगु, अयान शेख, अमृता दळवी, मेघना गवळी, समृद्धी इंगळे, तनिष्का बालदवा, ओमसाई बराड आणि ऋषिकेश गंगनावर या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
सात रस्ता परिसरातील बीआरडीएस सोलापूर केंद्राने यापूर्वीही ३० हून अधिक विद्यार्थ्यांना भारतातील विविध निफ्ट महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. केंद्राचे प्रमुख धर्मेश टंक यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही 90 टक्के निकाल लागला असून, यशस्वी विद्यार्थ्यांची आता एप्रिलमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी तयारी सुरू झाली आहे.
*डिझाइन क्षेत्रातील संधींचे दालन*
भारतात सध्या डिझाइनर्सची प्रचंड कमतरता आहे. दरवर्षी ६२,००० हून अधिक डिझाइनर्सची गरज असताना केवळ १७,००० डिझाइनर्स तयार होतात, असे सांगून टंक म्हणाले निफ्टच्या देशभरातील १९ केंद्रांमधून बॅचलर ऑफ डिझाइन आणि मास्टर्स ऑफ डिझाइन असे कोर्सेस चालवले जातात. या क्षेत्रातील पदवीधरांना केवळ उच्च पगाराच्या नोकऱ्याच मिळत नाहीत, तर ते स्वतःचे उद्योग सुरू करून ‘जॉब क्रिएटर्स’ बनत आहेत.
एआय (AI) च्या युगात सुरक्षित करिअर
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक क्षेत्रांतील नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता असताना, ‘डिझाइन’ हे क्षेत्र एआय-फ्रेंडली (AI-friendly) मानले जाते. सर्जनशीलता आणि मानवी दृष्टीकोन यामुळे या क्षेत्रातील मागणी भविष्यात अधिक वाढणार आहे.
बीआरडीएस सोलापूरच्या या यशाबद्दल शहरातून विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे कौतुक होत आहे.
Post Views: 5