जेऊर – “शेतकरी जोपर्यंत गाईला समजून घेत नाही, गाईच्या गोमूत्र आणि शेणाचा योग्य वापर करत नाही, तोपर्यंत शेतीचे खरे अर्थकारण फायद्याचे होणार नाही. गोमूत्र हे लाखो रुपयांची धनदौलत आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत ते शुद्ध सोन्यासारखे आहे. गाईचे महत्त्व शेतकऱ्यांना समजले, तर शेती आणि शेतकऱ्यांचे भविष्य निश्चित बदलू शकते,” असे परखड विचार प्रख्यात गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी व्यक्त केले.
ग्राम सुधार समितीच्या माध्यमातून कोटलींग मंदिर चिखलठाण येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जिव्हाळा ग्रुप’च्या स्नेहमेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष सुराणा हे होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर,प्रा . सुहास गलांडे,लोकविकासचे चेअरमन दीपक आबा देशमुख, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष प्रा. शहाजीराव देशमुख, आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना परमेश्वर तळेकर म्हणाले की, “रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे केवळ शेतीच नव्हे तर माणसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. जर निरोगी जीवन हवे असेल, तर देशी गाई आणि सेंद्रिय शेतीचा स्वीकार करावा लागेल. आज लोक डॉक्टरांवर हजारो रुपये खर्च करतात; पण स्वतःच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पारंपरिक आणि नैसर्गिक उपायांकडे दुर्लक्ष करतात. हीच परिस्थिती बदलण्याची गरज आहे.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष सुराणा यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याची गरज अधोरेखित केली. “विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींचा समतोल साधत वाटचाल केली, तरच समाजाची खरी प्रगती होईल. अंधश्रद्धेला खतपाणी घातले, तर कोणाच्याही जीवनाचे कल्याण होणार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
कार्यक्रमात राजेंद्र बारकुंड यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर गजेंद्र पोळ यांनी सूत्रसंचालन केले
यावेळी .यावेळी राजेंद्र रणसिंग, निळकंठ ताकमोगे, प्रशांत नाईकनवरे, कैलास लबडे, विलास लबडे, विजय लबडे, नानासाहेब साळुंखे, प्रमोद गव्हाणे, सचिन गव्हाणे, चंद्रकांत पवार,माजी प्राचार्य नागेश माने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली
Post Views: 4