सोलापूर : शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,सोलापूर (स्वायत्त संस्था) येथील कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभागाच्या २०२६ बॅचचा विद्यार्थी रोनी भकता (Roni Bhakta) याने जागतिक स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रोनी भकता याची EDRLab, पॅरिस, फ्रान्स येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये निवड झाली असून, त्याला
दरमहा ५,८०० युरो (अंदाजे रु.५.८५ लाख प्रतिमहिना) इतके आकर्षक वेतन पॅकेज प्राप्त झाले आहे. आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, संशोधनवृत्ती आणि जागतिक दर्जाच्या कामगिरीच्या बळावर त्याने हे
उल्लेखनीय यश संपादन केले असून, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान क्षेत्रात संस्थेसह देशाचेही नाव उज्ज्वल केले
आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. एस. ए. पाटील यांच्या हस्ते रोनी भकता यांचा सत्कार
करण्यात आला. यावेळी त्यांनी रोनी भकता यांच्या जागतिक स्तरावरील या उल्लेखनीय यशाचे कौतुक
करून त्यांच्या उज्ज्वल भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. एस. एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले तसेच प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान, कौशल्य, संशोधनवृत्ती आणि नाविन्यपूर्ण विचारांच्या बळावर जागतिक स्तरावरील संधींचा लाभ घेत
आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून संस्था व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
यावेळी कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. एस. व्ही. कुलकर्णी मेकॅनिकल अभियांत्रिकी
विभागप्रमुख डॉ. एस. बी. गडवाल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागप्रमुख
डॉ. आर. व्ही. दरेकर, सिव्हिल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. टी. डी. मसलेकर, मूलभूत विज्ञान
विभागप्रमुख प्रा. आर. एम. पंतोजी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एन. पाटील, आर अँड डी सेंटर प्रमुख डॉ. एस. आर. साखरे, एमएसएमई इन्क्युबेशन सेंटर प्रमुख प्रा. एस. एन. उपाध्ये उपस्थित होते व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते
*फोटो ओळी:- संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. एस. ए. पाटील यांच्या हस्ते रोनी भकता यांचा सत्कार प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले तसेच प्राचार्य डॉ. व्ही.व्ही.पोतदार व् प्राध्यापक वृंद*
Post Views: 18