कुर्डूवाडी – शहरात शुक्रवार दि.२९ रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आ.संजयमामा शिंदे व माजी आ.राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख कुर्डूवाडीच्या ईतिहासात प्रथमच जिल्ह्यातील सर्वात मोठे भव्य जंगी कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आले असल्याची माहीती छत्रपती शिवाजी महाराज तालीम संकुलनाचे प्रमुख आयोजक अस्लम काझी यांनी पत्रकार परिषदेत दीली. यावेळी यासिन बहामद,अमोल रचपूत उपस्थीत होते.
@ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून या कुस्ती मैदानाचे आयोजन केले असून कुर्डूवाडी परीसरासह संपुर्ण तालुक्यातील आजच्या तरूणाईत वाडत चाललेली व्यसनाधिनता,मोबाईलचे वेड,संपत चाललेले मैदानी खेळ,याबरोबरच महाराष्टृाची कुस्तीची व लाल मातीची संस्कृती जपण्यासाठी मैदान भरवल्याचे काझी यांनी स्पष्ट केले. गरीबाच्या घरीच कुस्ती जन्म घेते असे मानून यातुन मीळणारे उत्पंन्न गरीब मुलांना कुस्ती शिकवण्यासाठी उपयोगात आणले जाणार आहे.कुर्डूवाडी येथील संकुलनात महाराष्टृातील विवीध जिल्ह्यातून दोनशेपेक्षा जास्त मल्ल तयार करण्याचे काम चालु असून यासाठी महाराष्टृासह हरीयाणातील आंतरराष्टृीय दर्जाचे वस्ताद मुलांना शिकवण्यासाठी आहेत. कुर्डूवाडी व अकुलगाव ता. माढा हे परंपरागत कुस्ती साठी प्रसिद्ध आहे. महाराष्टृातील एक नामवंत पैलवान चांदीच्च्या बावन्न गदेचे मानकरी पै. अस्लमभाई काझी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कुस्ती फडात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख , पृथ्वीराज पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे चे वैभव माने,महारुद्र काळेल यांचा समवेश आहे.यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार संजयमामा शिंदे, नगराध्यक्ष जयश्री भिसे ,शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. छत्रपती शिवराय कुस्ती संकुल येथे आयोजित या स्पर्धेत २०० पेक्षा जास्त कुस्त्या या होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अस्लम काझी यांनी दिली.
Post Views: 13