बार्शी – मंगळवार दि. २६ मे रोजी दुपारी ४ चे सुमारास तालूका कृषी अधिकारी कार्यालयास बोगस उडीद बियाणे विक्रीची गोपनीय माहिती मिळाली. स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगांव, ता. परांडा, जि. धाराशिवचे प्रोपरायटर श्री. रत्नाकर रघुनाथ कोले यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीचे उडीद पिकाचे वाण NUL 7 (विश्वास ) बॅगची हुबेहूब नक्कल करुन स्वराज कॉलनी, बार्शी येथील गोडाऊनमध्ये २१६ बॅग व त्यांनी विक्री केलेले १६८ असे एकूण ३८४ बॅग (प्रति ५ किलो ) एकूण किंमत १९६० x ३८४ = ७,५२,६४० रुपये रकमेचे बियाणे जप्त केले.
सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर श्री. शुक्रचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी श्री. हरिदास हावळे श्री. संजय वाकडे, उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डुवाडी यांचे मार्गदर्शनखाली जिल्हास्तरीय भरारी पथक श्री. संतोष कोयले, तालूका कृषी अधिकारी बार्शी, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री. अतुल जाधव, श्री. बाळू बागल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, श्री. किशोर अंधारे, गुण नियंत्रण अधिकारी, श्री. गणेश पाटील, सहाय्य्क कृषी अधिकारी बार्शी, निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री. सोमनाथ भीमशेट्टी तसेच शहर पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी श्री. सचिन देशमुख इत्यादी उपस्थित होतें. सदर बोगस बियाणे विक्रेते यांचेवर रात्री उशिरापर्यंत बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
Post Views: 12