पिलीव – येत्या 28 मे 2026 रोजी येणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांच्या बकरी ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पिलीव दूर क्षेत्राच्या कार्यालयात पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मौलाना मुजमिल तांबोळी ,सलीम मुलाणी ,बालम जमादार ,बाबा सय्यद ,सद्दाम काझी ,शौकत तांबोळी ,राज पठाण ,निशाण उर्फ आलू पठाण , आदी प्रमुख समाज बांधव व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते
यावेळी बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर सूचना देताना गाई ,बैल म्हैस अशा जनावरांची कुर्बानी न देता पारंपारिक पद्धतीने बोकडाची कुर्बानी बकरीईद निमित्त दिली जावी व सार्वजनिक ठिकाणी कुरबानी किंवा बकरी ईद निमित्त कुरबानी देऊ नये तसेच शांततेच्या वातावरणात बकरीद साजरी करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे यांनी यावेळी केले
यावेळी येत्या 28मे 2026 रोजी बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता सामुदायिक नमाज अदा केली जाते व त्या ठिकाणी मौलाना कुर्बानी व बकरीईदचे महत्त्व कथन करतात हे त्यानंतर वैयक्तिक नवसाचे किंवा पारंपारिक पद्धतीचे कुर्बानी साठी क्षघरगुती स्वरूपात व्यक्तिगतरीत्या बोकडाची कुर्बानी दिली जाते या भागात कुठेही गाई बैल म्हैस किंवा गाईच्या वारसाची कुर्बानी दिली जात नसल्याचे यावेळी सांगण्यात आले बकरीदचाचा सण पिलीव
झिंजेवस्ती परिसरात शांततेच्या वातावरणात साजरी करण्याची हमी यावेळी समाज बांधवांच्या वतीने बाबा सय्यद सद्दाम काझी राज पठाण मौलाना मजमिल तांबोळी यांनी ग्वाही दिली .
फोटो
बकरी ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे यावेळी उपस्थित सलीम मुलाणी ,मुजमिल तांबोळी ,राज पठाण, बाबा सय्यद सद्दाम काझी, बालम जमादार शौकत तांबोळी , निशांत पठाण आलू पठाण ,राज पठाण आदी मान्यवर
Post Views: 5