भंगी गल्लीत हाणामारीच्या दोन घटना – परस्पर विरोधी आठ जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर – स्टेटस ठेवल्यावरून होणारे भांडण सोडविताना आणि पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून झालेल्या भांडणात हाणामारी प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले
आहेत .
पहिल्या घटनेतील – समीर इनामदार , मलिक इनामदार , अमन इनामदार , अहमद इनामदार ( सर्व रा इमामवाडा , लष्कर सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत अफान मुस्ताक शेख (रा-६२० उत्तर सदर बझार लष्कर सोलापूर )याने फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादीचा भाचा अब्दुल शेख याचे स्टेटस ठेवण्याचे कारणावरून रविवारी रात्री घरासमोर भांडण झाले होते .त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी व भाऊ गेले असता वरील आरोपींनी घरातून लोखंडी रॉड आणून काचेची बाटली डोक्यात मारली , तसेच फायटरने व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले व शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. . पोलीस हवालदार सुरवसे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
दुसऱ्या घटनेतील – वस्ताद शेख , यासीन शेख , अजहर शेख , अयान शेख ( रा-इमामवाडा , लष्कर सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत मलीक समीर इनामदार (वय-२० वर्षे, रा-६३९ उत्तर सदर बझार इमामवाडा सोलापूर ) यांनी फिर्याद दिली
आहे .
यातील फिर्यादी हा दि २५ मे रोजी दुपारी १२.३० वा चे सुमारास बहिणीस नर्सिंग कोर्सला सोडण्याकरीता जात असताना भंगी गल्ली येथे रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वरील आरोपींनी फिर्यादीस व त्याच्या भावाला लाकडी काठीने हातावर , पोटावर ,पाठीवर मारून शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादित म्हंटले आहे. पोलीस हवालदार मनोहर हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .