तभा वृत्त सेवा शेखर म्हेत्रे माढा प्रतिनिधी दिनांक ७ जून : माढा तालुक्यातील उपळाई खु येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेश कार्याध्यक्ष विनंती कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवस गावासाठी स्वच्छता अभियान ही संकल्पना राबवली जात असून त्याची सुरुवात रविवार ७ जून रविवार पासून करण्यात आली आहे. गावकऱ्यांकडून पंधरा दिवसातून एक दिवस कायमस्वरूपी गावात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे विनंती कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
या स्वच्छता अभियानात सामाजिक कामात अग्रेसर असलेले युवक ज्येष्ठ नागरिक व महिलांनी सहभाग नोंदवत गावातील अनेक ठिकाणची स्वच्छता केली यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना जिल्हा परिषद शाळा पिण्याच्या पाण्याची टाकीचा परिसर स्वच्छ केला.
या कार्यात अॅड सुरेश पाटील, रानबा कदम, राजीव मोहीते ,स्वप्नील कदम, नरेश कदम, माऊली कदम, सौदागर फरतडे, आलोक कदम, समर्थ चव्हाण, अनिस सय्यद, मल्हार देवकते, सौरव कदम, ऋषिकेश कदम , सुनील माळी आदी नागरिक व महिला उपस्थित होते.
Post Views: 31