कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते .
प्रथम कारखान्याचे संस्थापक कै . सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर झालेल्या सभेतकार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली .
आपल्या भाषणात पुढे बोलताना प्रशांतराव परिचारक म्हणाले की, अल निनो च्या प्रभावामुळे यावर्षी ऊस पीक धोक्यात आले आहे . उजनी धरण भरले असले तरी पाऊस जर झाला नाही तर उजनी धरणाचे पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवले जाईल त्यामुळे पुढील हंगामात लागणी कशा होणार ही चिंता आहे .
असे असले तरी कारखान्याचे संस्थापक सुधाकरपंत परिचारक व जेष्ठ मंडळींनी शेतकरी हीत डोळ्या समोर ठेवून कारभार केला तोच आदर्श पुढे ठेवून कारखाना वाटचाल करीत आहे . आज आपण साखर निर्मिती बरोबर वीज , इथेनॉल यासारखे उपपदार्थ निर्मिती करत असल्याने आपण सक्षम आहोत गतवर्षी एफ आर पी पेक्षा २०० रु जादा दर दिला आहे .
येणारा कालावधी साखर उद्येगा साठी कसोटीचा आहे आपण सर्वानी मिळून यातून मार्ग काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले .
प्रथम व्हा . चेअरमन कैलास खुळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले .
या कार्यक्रमात ऊस विकास भूषण व कर्मयोगी आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करणेत आले .
तसेच सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला . कार्यकमाचे सुत्रसंचालन डॉ . सुधीर पोफळे यांनी केले .
सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते .





















