सांगोला – सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने लोहमार्ग पोलिस स्टेशन, पंढरपूर येथे सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती हरी बाबर यांनी दिली.
महाराष्ट्राचे मुख्य देवस्थान पंढरपूर येथे असल्याने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भारतातून वारकरी मोठ्या प्रमाणात येतात. क्राईम, रेल्वे अपघात, जखमी, प्रमाणात वाढ होत आहे. पंढरपूर स्टेशनवर गव्हर्मेंट रेल्वे पोलीस लोहमार्ग चौकी लहान असून पावसाळ्यात पाणी गळत आहे. सद्या बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही तसेच पंढरपूर वारीच्या वेळी पुणे लोहमार्ग येथून १०० ते २०० पोलीस कर्मचारी बंदोबस्त करण्यासाठी येतात. त्यांना बसण्यासाठी जागा नाही. कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत पंढरपूर दुरक्षेत्र आहे. तक्रार दाखल करायची असल्यास कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यात जावे लागते. मिरज ते कुर्डुवाडी अंतर १९० किलोमीटर आहे. मिरज येथून येणाऱ्या प्रवासी यांना तक्रार देण्यासाठी कुर्डुवाडी येथे जावे लागते. तरी दोन्ही पोलीस ठाण्यात अंतर जास्त असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पंढरपूर येथे लोहमार्ग पोलीस ठाणे झाल्यास प्रवाशांची सोय होईल, अशी मागणी शहीद अशोक कामटे संघटनेने केली आहे. या निवेदनाच्या प्रती अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री भारत सरकार, डॉ.पंकज भोयर गृहनिर्माण राज्य मंत्री महाराष्ट्र, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे मुंबई, पोलीस महासंचालक लोहमार्ग मुंबई, पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांनीही देण्यात आले आहेत.
चौकट-
रेल्वेच्या हद्दीतील कवठेमहांकाळ, ढालगाव, डोंगरगाव, सांगोला क्राईमच्या छोट्या तक्रारीला सुद्धा प्रवाशांना कुर्डूवाडी या ठिकाणी जावे लागत असल्याने प्रवाशांना याचा मनस्ताप होत आहे. याची अनेक प्रवाशांनी संघटनेकडे मागणी केली आहे. पंढरपूर येथे लोहमार्ग पोलीस ठाणे निर्मिती/ मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंजूर झाल्यास प्रवाशांना वेळेत तक्रार देता येणे शक्य होणार आहे.
-निलकंठ शिंदे, अध्यक्ष
शहीद अशोक कामटे संघटना, सांगोला.
Post Views: 21