सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी महापौर कोंड्याल यांनी पुष्पगुच्छ देऊन राऊत यांचे स्वागत करत आगामी निवडणुकीसाठी तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा झाली. महापौर कोंड्याल यांनी राऊत यांच्या उमेदवारीचे स्वागत करत त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विकासासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक प्रथमेश कोठे, विजय राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही राजेंद्र राऊत यांचे अभिनंदन करून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 46