
सांगोला – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे. फॅबटेकच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे सांगोल्याच्या वैभवात मोठी भर पडली असून संस्थेचे कार्य अनुकरणीय असल्याचे मत ग्रामविकास व पंचायतराज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस भेटी दरम्यान व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी फॅबटेक मधील फार्मसी, इंजिनिअरिंग, पाॅलिटेक्निक महाविद्यालयातील विविध विभागाला तसेच ग्रंथालयास भेट देऊन माहिती घेतली. या दरम्यान फॅबटेक संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डाॅ.अमित रूपनर, दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डाॅ.संजय आदाटे, प्राचार्य डाॅ.रविंद्र शेंडगे, उपप्राचार्य डाॅ.विद्याराणी क्षीरसागर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डाॅ.तानाजी बुरूंगले आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 10