मळोली – मळोली ता माळशिरस येथील तीन युवक वेळापूर वरून मळोली गावाकडे येत असताना मळोली कडून वेळापूर कडे जाणाऱ्या टाटा पंच गाडीने समोरासमोर धडक दिल्याने दोन युवक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, अकलूज सांगोला या महामार्गाचे नूतनिकरण झाले असून या नूतनिकरणाने अपघातात वाढ झाली असून या अगोदर अनेक वेळा या मार्गांवर अपघात वाढल्याचे दिसत आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता वेळापूर कडून मळोली च्या दिशेला मोटारसायकल एम एच 45 ए एच 4338वरून निघालेले चि. रोहन गणपत जाधव चि. मयूर सुखदेव शिंदे व सागर तुळशीराम मगर यांना वेळापूरच्या दिशेने जानाऱ्या टाटा पंच mh 11 d z 2172 या गाडीने समोरासमोर धडक दिल्याने मोटारसायकल वरील युवक गंभीररित्या जखमी झाले. अपघाताची तीव्रता एवढी भीषण स्वरूपाची होती की यातील मोटारसायकल वरील एका युवकाचा पाय जाग्यावरच तुटून पडला. अपघात घडल्यानंतर टाटा पंच गाडी सुमारे दीडशे फूट ब्रेक लावत बाजूच्या गटारात जाऊन पडली.अपघाता नंतर रुग्णालयात नेत असताना चि. रोहन जाधव व मयूर शिंदे यांची प्राणज्योत मालवली तर सागर मगर अकलूज येथील डॉ इनामदार यांचे रुग्णालयात उपचार घेत आहे.
मळोली येथील इलेक्ट्रिक मोटार रिवायडींग चा व्यवसाय करणारे चि. रोहन जाधव यांचे मागील काही दिवसापूर्वी लग्न जमले होते. चार चाकी गाडी टाटा पंच या चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघातात घडल्याचे दिसून येत असून टू व्हीलर वरील हे युवक त्यांच्या बाजूने जातं असल्याचे दिसत आहे. अपघातात मोटारसायकल एका बाजूनी पूर्णतः तुटली असून चार चाकी गाडीची ड्रायव्हिंग च्या बाजूचे बोनेट व आरसा तुटून गेला आहे.सागर तुळशीराम मगर हा युवक इलेट्रिक काम शिकण्यासाठी रोहन जाधव यांचेकडे येत होता. तो निमगाव मगराचे येथील असून तो ही या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मळोली येथील रोहन जाधव व मयुर शिंदे हे दोन्ही युवक स्वतःचा व्यवसाय करून आपला उदरनिरवाह करीत होते. अतिशय गंभीर झालेल्या या अपघाताने या मार्गांवरील गतिरोधक बसविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली असून या मार्गांवर सतत घडणारे अपघात यातून शासनाच्या माध्यमातून कोणतीही उपाययोजना केली जातं नसल्याचे येथील नागरिकांनी बोलून दाखविले. या अगोदर अनेक वेळा गतिरोधकांची मागणी प्रशासनास केली असून केवळ तात्पुरत्या स्वरूपात छोटे वेळ मारून नेण्याचे प्रकार घडत आहेत.सदर घटना घडल्यानंतर वेळापूर पोलीस ठाण्यातील पोलीस श्री नितीन लिंगडे , पो हे. कॉ. माळी, साहिल तांबोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स पो. नी.श्री आशिष कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















