मोडनिंब – सोलापूर पुणे महामार्गावर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ मुंबईवरून हैदराबाद येथे जात असलेल्या एका भरधाव ट्रक क्र. (KA 32 AC 2531) ने रस्त्यात नादुरुस्त उभ्या असलेल्या एका ट्रक क्रमांक (KA 32 D 0470) ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एक ट्रकचालक तरुण डोक्याला आणि उजव्या पायाला जबर मार लागल्याने गंभीर जखमीं झाला.

या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव इस्माईल इसाकअली चित्तापुरे (वय २५ वर्षे , रा आळंद जि गुलबर्गा कर्नाटक) येथील रहिवासी सदर अपघातामध्ये गंभीर जखमीं झालेल्या ट्रक चालकाला सावळेश्वर टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक रोहित काकडे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच सावळेश्वर टोल नाका येथील ग्रस्तीपथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, असून या सदर अपघाताची माहिती फौजदार चावडी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी आणि पाकणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी यांना सावळेश्वर टोल येथील ग्रस्तीपथक प्रमुख फारुख तांबोळी यांनी दिली असल्याचे डॉ. महेंद्र ताकतोडे यांनी सांगितले.





















