अक्कलकोट – महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून अक्कलकोट आगारास पाच नव्या राजमाता जिजाऊ बस प्राप्त झाल्या असून, त्यांचे लोकार्पण आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी अक्कलकोट आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अक्कलकोट शहरात श्री स्वामींच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात,त्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळावी, हीच भूमिका होती, तसेच ग्रामीण भागातील वाहतूक अधिक सक्षम व्हावी आणि एसटी सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा केला,
याच प्रयत्नांना यश मिळून अक्कलकोट आगाराला या नव्या आरामदायी बस उपलब्ध झाल्या आहेत, यामुळे विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांना निश्चितच मोठा लाभ होणार आहे,
अक्कलकोटच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासन, परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाचे मनपूर्वक आभार मानतो, अक्कलकोट बस आगार अधिक सक्षम करण्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही कायम राहील असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले,
या प्रसंगी आगार व्यवस्थापक सत्यशील खताळ, स्थानक प्रमुख नागेश रोडगे, कार्यशाळा अधीक्षक एम, के,पाटील, वाहतूक नियंत्रक तुकाराम शिंदे, पाळी प्रमुख सुनील जवळेकर, कर्मचारी राजू मुनाळे, गुरु गोडेन, अंबण्णा कोळी, अभि काळे, वसंत बंडगर, निवृत्ती वेरूळकर, सिद्धाराम चौगुले आदी तसेच कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते,
Post Views: 12