सोलापूर – चंद्रपूर जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड यांच्या कथित वादग्रस्त कामकाजाच्या पद्धतीविरोधात महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेने सोमवारी राज्यभर निषेध आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूर जिल्हा परिषद लेखा विभागातील सुमारे ९० हून अधिक कर्मचारी दिवसभर काळ्या फिती लावून काम केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सर्व कर्मचाऱ्यांनी काळया फीती लावून आंदोलनाला पाठिंबा दिला.
चंद्रपूर येथील संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी आणि त्यांचे निलंबन करून यापुढे जिल्हा परिषद स्तरावर नियुक्ती देऊ नये, अशी मागणी संघटनेने केली आहे. लिपिक कर्मचारी संघटना कडून दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना निवेदन देणे देऊन संघटनेचा पाठिंबा जाहीर केला.
जिल्हा परिषदेच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवस्थेत लेखा विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. निधीचे व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि दैनंदिन प्रशासकीय व्यवहाराशी संबंधित कामकाजात लेखा कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून संवादातून प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे कर्मचारी संघटनेचे नेते व प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी सांगितले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















