कुर्डूवाडी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत कुर्दुवाडीच्या आदर्श पब्लिक स्कूलने यशाचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. शाळेच्या उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध स्पर्धा परीक्षा पॅटर्नमुळे एकूण प्रविष्ट १४९ विद्याथ्र्यांपैकी तब्बल ११४ विद्यार्थी या कठीण परीक्षेत पात्र ठरले असून, अनेक विद्यार्थ्यांनी २०० हून अधिक गुणांची द्विशतकी धावसंख्या पार करत गुणवत्ता यादीत उच्च स्थान मिळवले आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अमोल सुरवसे व प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
चौकट –
११४ विद्यार्थ्यांना यश
इयत्ता ५ वीचे मानकरीः चोपडे भार्गवी हिने २५६ गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
त्याखालोखाल शेंडे ओंकार (२५४), पवार स्मरणिका (२५४), घाडगे दुर्वा (२५०), करळे वेदिका (२४८), कदम सार्थक (२४२), देवकते वैष्णवी (२४०), शिंदेस्वरा (२३६), कांबळे आरोही (२३४) आणि क्षीरसागर शिवांश यांनी २३२ गुण मिळवून यश संपादन केले. याशिवाय इतर ६२ विद्याथ्यर्थ्यांनीही उल्लेखनीय गुण घेत पात्रता सिद्ध केली आहे.
Post Views: 13