सांगोला – शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला येथे व्यसनमुक्त परिसर-व्यसनमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेअंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय, सांगोला शाखेच्या नलिनी दीदी, इंदिरा दीदी, पांडुरंग कुंभार उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी तरुण वयातच व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा असे आवाहन केले. मार्गदर्शन करताना नलिनी दीदी यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच आपल्या मित्रांनाही व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन तसेच इंदिरा दीदी यांनी निरोगी शरीर आणि शांत मन यासाठी योग, ध्यान, व्यायाम, वाचन, खेळ आणि सकारात्मक छंद जोपासण्याचा सल्ला दिला. पांडुरंग कुंभार यांनी आजचा विद्यार्थी व्यसनमुक्त, शिस्तप्रिय आणि जबाबदार असेल तरच उद्याचा समाज अधिक सक्षम बनेल, असे सांगितले. संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड, सचिव अंकुशराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.सागर साळुंखे यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 9