Tuesday, September 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘ड’ श्रेणीतील ५७१ शाळा शून्यावर आणण्यासाठी नवोपक्रम ! 

तरुण भारतbyतरुण भारत
September 29, 2026
in soalpur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी अभिनव उपक्रम पुढे आणला आहे. जिल्ह्यात भौतिक सुविधा श्रेणीकरणात ‘ड’ श्रेणीत असलेल्या ५७१ शाळांना ‘क’ श्रेणीत आणून ‘ड’ श्रेणीतील शाळांची संख्या शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २,५०० शाळांचा आढावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी घेण्यात आला होता. या आढावा बैठकीत ‘ड’ श्रेणीतील शाळांची श्रेणीवाढ करण्यासाठी अंदाजे ६१ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या निधीची गरज लक्षात घेऊन केवळ उपलब्ध शासकीय निधीवर अवलंबून न राहता समाजातील विविध घटकांना शाळांच्या विकासाशी जोडण्याचा नवोपक्रम मांडण्यात आला आहे.
केवळ ‘ड’ श्रेणीतील शाळांना ‘क’ श्रेणीत आणणे एवढेच उद्दिष्ट न ठेवता ‘ड’मधून ‘क’, ‘क’मधून ‘ब’ आणि ‘ब’मधून ‘अ’ असा शाळांच्या भौतिक सुविधांच्या गुणवत्तावाढीचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. या नवोपक्रमातून निधी उभारणीसोबतच शाळा आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न होणार असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवे बळ मिळू शकते.
(  टीप चेतनसिंह केदार सावंत आणि सोलापूर जिल्हा परिषद फोटो आणि लोगो लावणे )
चौकट
‘माझी शाळा, माझी जबाबदारी’ची संकल्पना
शाळा ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता त्या शाळेच्या विकासात गावकऱ्यांचा, पालकांचा आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी ‘माझी शाळा, माझी जबाबदारी’ या भावनेतून लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. गावपातळीवर शाळेच्या आवश्यक कामांची यादी तयार करून ग्रामस्थ, पालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने निधी अथवा साहित्य उपलब्ध करून घेता येणार आहे.
चौकट
माजी विद्यार्थ्यांना शाळेशी जोडणार
शाळेतून शिक्षण घेऊन आज उच्च पदांवर कार्यरत असलेल्या तसेच विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा शाळास्तरीय मेळावा आयोजित करण्याचा विचार आहे. या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या विकासात योगदान देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
चौकट
सी.एस.आर. निधीचा प्रभावी वापर
कॉर्पोरेट कंपन्या आणि विविध उद्योगांच्या सी.एस.आर. निधीतून शाळांच्या मूलभूत सुविधांसाठी आर्थिक मदत मिळविण्यावरही भर राहणार आहे. शाळांची गरज आणि आवश्यक कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्यानुसार सी.एस.आर.संस्थांशी संपर्क साधण्याचे नियोजन करता येणार आहे.
चौकट
अधिकारी-पदाधिकारी घेणार शाळेची जबाबदारी
जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य यांनी ‘ड’ श्रेणीतील प्रत्येकी एक शाळा दत्तक घेऊन तिच्या भौतिक सुविधा सुधारण्यासाठी योगदान देण्याची संकल्पना पुढे आली आहे.
चौकट
कर्मचारी पतसंस्थांचाही सहभाग
जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचारी पतसंस्थांना आवाहन करून शाळा दुरुस्तीसाठी निधी उभारण्याचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेसोबतच कर्मचारी वर्ग आणि सामाजिक घटकही या अभियानाशी जोडले जाण्याची शक्यता आहे.
कोट
‘ड’ श्रेणीतील शाळांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न
शाळांच्या भौतिक सुविधा सुधारल्याशिवाय विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शासनाच्या निधीसोबतच समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेऊन ‘ड’ श्रेणीतील शाळांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” त्याच धर्तीवर जिल्ह्यातील आरोग्य केंद्राची माहिती घेऊन वर्गीकरण करण्यात येईल. अशी भूमिका शिक्षण विभागाचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी मांडली आहे.
Post Views: 6
Previous Post

शिवाजी पॉलीटेक्निकमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती

Next Post

पर्यावरण संवर्धनाचा क्रांतीकारी उपक्रम: सोलापूर जिल्ह्यात जमा २००० किलो निर्माल्यापासून बनणार सेंद्रिय कंपोस्ट खत!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पर्यावरण संवर्धनाचा क्रांतीकारी उपक्रम: सोलापूर जिल्ह्यात जमा २००० किलो निर्माल्यापासून बनणार सेंद्रिय कंपोस्ट खत!

पर्यावरण संवर्धनाचा क्रांतीकारी उपक्रम: सोलापूर जिल्ह्यात जमा २००० किलो निर्माल्यापासून बनणार सेंद्रिय कंपोस्ट खत!

ताज्या बातम्या

ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त

ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त

September 29, 2026
सेवा संकल्प अभियानातून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

September 29, 2026

18 वर्षीय तरुणाची गळफासाने आत्महत्या

September 29, 2026
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

September 29, 2026

श्री भ्रमरांबिका नवरात्र महोत्सव मंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी शिवानंद बेलाटे

September 29, 2026

दिव्यांग, ज्येष्ठांसाठी मनपाचे गुरुवारी मोफत आरोग्य शिबिर

September 29, 2026

श्री भगवंत देवस्थानच्यावतीने नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन 

September 29, 2026

भटके विमुक्त विकास परिषदेमार्फत विशेष शिबिराचे आयोजन

September 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1277021

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!