सोलापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या परीक्षेत संतोषनगर, विजापूर रोड येथील शांती ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सने आपले यशाचे सातत्य टिकवून ठेवले आहे. या कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत गुण मिळवून यश संपादन केले आहे.
कॉलेजमधील प्रथम तीन क्रमांक पटकावलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:
*१. कु. जोजारे पुर्वा – ८३.६७% (प्रथम)*
*२. कु. गंभीरे स्नेहा – ८३.३३% (द्वितीय)*
*३. कु. काबरा यश – ८१.५०% (तृतीय)*
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. सिद्धेश्वर अण्णाराव पाटील, संस्थेचे इतर सर्व सदस्य, प्राचार्य श्रीमती रजुला मॅक तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांकडूनही कौतुक होत आहे.


























