Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोटची 200 वर्षांची परंपरा: मौलाली गल्लीतील मोहरम, श्रद्धा आणि एकतेचा संगम

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in marathwada
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट : इस्लाम धर्मातील पवित्र मोहरम महिन्याला अक्कलकोट शहरात मोठ्या श्रद्धेने प्रारंभ झाला आहे. शहरातील मौलाली गल्ली येथील मौलाली पंजांची परंपरा तब्बल 200 वर्षांहून अधिक काळापासून अखंडपणे सुरू आहे.सर्वच समाजातील भाविक एकत्र येऊन हा मोहरम सण साजरा करतात, हीच या परंपरेची खरी ताकद आहे. ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून, अक्कलकोटच्या सामाजिक एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनली आहे.
तीन पंजे, एकच श्रद्धास्थान
मौलाली गल्ली येथे एकाच ठिकाणी तीन पवित्र पंजे बसवण्याची अनोखी परंपरा आहे. यामध्ये मौलाली साहेब पंजे, गैबीसाहेब पंजे आणि नाले हैदर साहेब पंजे यांचा समावेश आहे. चंद्रदर्शनानंतर मोहरमला सुरुवात होताच खुदाळी मारून पर्वाची सुरुवात होते. पहिल्या दिवशी मौलाली साहेब व गैबीसाहेब पंजे बसवले जातात, तर पाचव्या दिवशी नालेहैदर साहेब पंजे विराजमान होतात.
नैवेद्य, गलफ-शेरे व नवसपूर्ती: भक्तीचा ओघ
पाचव्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत, म्हणजेच योमे आशुरा पर्यंत, भाविक भक्त मोठ्या प्रमाणात नैवेद्य घेऊन दर्शनासाठी येतात. तसेच पंज्यांना गलफ, शेरे अर्थात फुलांचे हार अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
नवसपूर्तीची अनोखी परंपरा:
विशेष म्हणजे, मागील वर्षी ज्या भाविकांनी नवस बोलून नैवेद्य मागितले होते, त्यांचे नवस पूर्ण झाल्यावर अनेक भाविक पंज्यांना चांदीचे घोडे अर्पण करतात. तसेच नवस फेडण्यासाठी नियाज म्हणजेच कंदुरीचा कार्यक्रम भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने केला जातो.
अनेक वर्षांपासूनची ही श्रद्धा परंपरा आहे की, एखाद्या घरात जन्मलेल्या बाळाची तब्येत सतत बिघडत असल्यास आणि अनेक दवाखान्यांत उपचार करूनही गुण न आल्यास, मौलाली पंज्यांना नवस केला जातो. बाळ सुखरूप झाल्यावर व आजारातून पूर्ण बरे झाल्यावर त्या बाळाला ‘बाग’ म्हणून रंगवून, पंज्यांच्या दारी आणून नवस पूर्ण करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. या श्रद्धेतूनच पंज्यांवरील भाविकांची श्रध्दा दिसुन येते .
पिढ्यानपिढ्या जपलेली सेवा: परंपरेची अखंड साखळी
200 वर्षांची ही परंपरा जपण्यात अनेक सेवेकऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. मौलाली पंजाची सवारी घेण्याची सुरुवात भोई समाजातील गोपाळ भाई यांनी केली. त्यानंतर ही सेवा इमाम मन्यार, मग जॉनी शेख दारूवाले, मुसा शेख,त्यानंतर सत्तार फरास यांनी निष्ठेने पार पाडली. मागील 45 वर्षांपासून ही सवारी युसुफ बागलकोटे हे घेत असून, परंपरेची ही अखंड साखळी त्यांनी जपली आहे.
तसेच सोलापूरच्या समाधान नगर येथील महिबूब मुल्ला हे मागील 65 वर्षांहून अधिक काळ मौलाली पंजे सवारीचे सेवेकरी (छडीदार) म्हणून निस्वार्थ सेवा करत आहेत. या सर्व सेवेकऱ्यांची निष्ठा हाच या 200 वर्षांच्या परंपरेचा कणा आहे.
तसेच या परंपरेतील पवित्र विधी ‘उदान भरण्याचा’ मान मागील 100 वर्षांहून अधिक काळापासून ताची कुटुंबाकडे आहे.पिढ्यानपिढ्या हे कुटुंब ही सेवा श्रद्धेने पार पाडत आहे.
आगी तुडवण्याची 200 वर्षांची परंपरा
मोहरमच्या आठव्या दिवशी ‘आगी तुडवणे’ हा मुख्य कार्यक्रम असतो. सुरुवातीला 20 मन लाकडापासून सुरू झालेला हा विधी 85 मन लाकडांपर्यंत पोहोचला होता. सध्या 20 ते 25 मन लाकूड वापरून हा कार्यक्रम पार पाडला जातो.विशेष म्हणजे, 200 वर्षांच्या या परंपरेला आजपर्यंत कधीही गालबोट लागलेले नाही.
या आगी तुडवण्याच्या पवित्र विधीसाठी लागणारे संपूर्ण लाकूड मागील साठ वर्षांहून अधिक काळापासून स्वर्गवासी नूरुद्दीन खिस्तके(कारभारी)परिवार – हे श्रद्धेने देत आले आहेत. त्यांच्या या निस्वार्थ त्यागामुळे ही परंपरा अखंड सुरू आहे
रात्री दीड-दोन वाजता आगी तुडवल्यानंतर, सवारीमध्ये असलेले पंजे गाजावाजा न करता मौलाली गल्ली ते नाईकवाड गल्लीपर्यंत नेले जातात. परंपरेनुसार नाईकवाड गल्ली येथील भाविक पंजांना पाणी घालतात, उदानात उद-लोभान घालतात व नारळ फोडतात व दर्शन घेतात. त्यानंतर पंजे पुन्हा मौलाली गल्लीतील स्थानावर विराजमान होतात. शहरासह तालुक्यातील हजारो भाविक श्रद्धेने हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहतात.
योमे अशुरा: भक्तीचा कळस
दहाव्या दिवशी, योमे अशुरा रोजी, सायंकाळी 4 वाजता मौलाली गल्लीतून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होतो. मौलाली साहेब, गैबीसाहेब आणि नाले हैदर साहेब यांचे पंजे कारंजा चौक, मेन रोड, फुलारी चौक, फतेहसिंह चौक मार्गे नाईकवाड गल्लीतून हत्ती तलावाजवळील साखर विहीर येथे पोहोचतात. येथेच पंजांच्या विसर्जनाने 10 दिवसांच्या पर्वाची सांगता होते.
सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास म्हणाले, “मौलाली गल्लीतील मोहरम ही केवळ अक्कलकोटची नाही, तर संपूर्ण परिसराच्या श्रद्धेची आणि बंधुत्वाची ओळख आहे. भोई समाजापासून ते युसुफ बागलकोटे आणि महिबूब मुल्ला,उदान भरणारे त्याची कुटुंब आणि लाकूड सेवा देणारे स्वर्गवासी नूरुद्दीन खिस्तके कारभारी (परिवार) यांच्यापर्यंत सर्व सेवेकऱ्यांमुळे 200 वर्षे ही परंपरा जिवंत आहे. नैवेद्य, गलफ-शेरे, चांदीचे घोडे, नियाज-कंदुरी आणि बाळाच्या आरोग्यासाठीचा नवस पूर्ण करणारे हजारो भाविक हेच या परंपरेचे खरे साक्षीदार आहेत. शोक, त्याग आणि बलिदानाचा संदेश देणारा हा पर्व सर्वांनी एकत्र येऊन साजरा करतात .
Post Views: 40
Previous Post

सांगोला नगरपरिषदेत आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन उत्साहात साजरा

Next Post

गुरुवारी जि.प.ची सर्व साधारण सभा पंढरपुरात 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
गुरुवारी जि.प.ची सर्व साधारण सभा पंढरपुरात 

गुरुवारी जि.प.ची सर्व साधारण सभा पंढरपुरात 

ताज्या बातम्या

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा धर्मादाय संस्थांना पुढे येण्याचे आवाहन #solapurnews

July 16, 2026

धनंजय मुंढे मंत्री व्हावे म्हणून केली लाडूंची तुला #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

July 16, 2026

शेगावीच्या श्री गजाननाच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

विठ्ठलाला दिल्या अहिल्यानगरच्या भक्तांने सोन्याच्या अर्धा किलोच्या पादुका #viral #marathinews

July 16, 2026

पंढरपूरात पुन्हा एफडीएची धडक कारवाई #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

अवघड आहे वृद्ध आई वडीलानाच काढले घराबाहेर #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरणासाठी व संवर्धनाचा हिशोब द्या #viral

July 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0979587

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!