
सांगोला – आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन सांगोला नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महिला व बाल कल्याण समिती सभापती छाया मेटकरी यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी आरोग्य सभापती गोदाबाई बनसोडे, नगरसेविका राणी माने, आशादेवी यावलकर, श्रद्धा साबळे, अनिता केदार, सुजाता केदार, वैशाली झपके, शोभा फुले, सीमा सरगर, तनुजा एरंडे तसेच मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ.सुधीर गवळी यांनी आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यालयीन अधीक्षक सचिन पाडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचे औचित्य साधून ज्योतिबा फुले जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. कर निरीक्षक प्रियांका पाटील यांनी एकल महिलांकरिता असलेल्या विविध आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी उपस्थित अनेक एकल महिलांनी आपल्याला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर आपले मत मांडले. राणी माने यांनी एकल महिलांच्या पाठीशी नगरपालिका खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. छाया मेटकरी यांनी एकल महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजात समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी सांगोला नगरपरिषद कटिबद्ध आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाला सांगोला शहरातील एकल महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद थोरात, जयश्री खडतरे, सविता लोखंडे, कोमल चांडोले, सारिका लोखंडे आणि प्रतिभा कोरे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे यांनी केले. आभार कर निरीक्षक अस्मिता निकम यांनी मानले.
Post Views: 7