सोलापूर : भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश, हदयम हॉस्पिटल व समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, शेळगी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शेळगी येथे उद्या शनिवारी सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मातोश्री सभागृह, लोकमंगल बँकेजवळ, शेळगी येथे हे शिबीर होणार आहे. नागरिकांसाठी विविध आजारांवरील मोफत तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिरात त्वचारोग, दंतरोग, रक्त तपासणी, स्त्रीरोग, लघवी तपासणी, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मेंदू विकार, पाय दुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, निद्रासंबंधी समस्या, गाठी, कॅन्सर तसेच ईसीजी आदी तपासण्या करण्यात येणार आहेत.
शिबिरात प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पाटील हे नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पाटील हे एम.डी. (मेडिसिन), डी.एम. कार्डिओलॉजी पदवीधारक असून जर्मनी येथे कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीचे विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे.
मोफत आरोग्य शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन हृदयम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. शैलेश पाटील आणि समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवलिंग शहाबादे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शिवलिंगचंद्रकांत रामणशेट्टी – ८८८८८०२६४८, शिवशरण – ९४०४०१४४४५ व अल्ताफ इनामदार – ९१५६००२६०४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 26