बार्शी – डोंबिवली येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारलेला सोमवार दि. २० रोजीचा राज्यव्यापी लाक्षणिक संप इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने स्थगित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत आवाहन केल्यानंतर आणि आरोपीचा जामीन स्थगित केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी राज्यातील आरोग्य सेवा पूर्ववत सुरु राहणार असून रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ आयएमएसह विविध वैद्यकीय संघटनांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती.
मात्र उच्च न्यायालयाने शनिवारी विशेष सुनावणी घेत आरोपीचा जामीन स्थगित केला. तसेच संबंधित आरोपीला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. याच आदेशात न्यायालयाने डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आयएमएने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी बार्शीसह राज्यातील सर्व वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरु राहणार आहेत.
Post Views: 13