Thursday, October 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विडी कामगारांना किमान वेतन द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

तरुण भारतbyतरुण भारत
May 21, 2026
in solapur
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – विडी कामगारांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार फरकासह किमान वेतन तात्काळ लागू करावे, अशी जोरदार मागणी ज्येष्ठ कामगार नेते कॉ. नरसय्या आडम यांनी केली. महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्तालयात झालेल्या बैठकीत विडी कामगारांना शासन निर्णयानुसार किमान वेतन, थकबाकीचा फरक, कारखान्यात रोख मजुरी आणि किमान दहा हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांना विविध कामगार संघटनांनीही पाठिंबा दर्शविला.
       बैठकीत बोलताना कॉ. आडम यांनी सांगितले की, पूर्वी विडी उद्योगावर २८ टक्के जीएसटी होता, तो आता १८ टक्क्यांवर आला आहे. तंबाखूवरील जीएसटीही कमी करण्यात आला असून, दर हजार विड्यांमागे पाच टक्के सेसही आकारला जातो. इतक्या सवलती मिळूनही विडी कामगारांना किमान वेतन न देणे संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले. २०१४ पासून या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, अनेक बैठका होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने हजारो विडी कामगार आर्थिक अन्याय सहन करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
        दरम्यान, मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी इतर राज्यांत कमी मजुरी दिली जाते तसेच कच्च्या मालाच्या वाढत्या दरामुळे उद्योग चालविणे कठीण होत असल्याचे सांगितले. उत्पादन खर्च वाढल्याने शासनाने वास्तव परिस्थिती लक्षात घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कमी मजुरी दिली जात असल्याचे स्पष्ट करत, केंद्र सरकारकडून भविष्यात किमान वेतनात वाढ झाल्यास ती कामगारांना देणे बंधनकारक राहील, असे सांगितले. तसेच विडी कामगारांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
        कामगार संघटनांनी किमान वेतन कायदा आणि सामाजिक सुरक्षा संहितेनुसार विडी कामगारांना न्याय मिळणे आवश्यक असल्याचे सांगत, शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या बैठकीस कामगार संघटनांच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम, सीटू चे राज्य महासचिव एम. एच. शेख, युसुफ शेख, नसीमा शेख, विल्यम ससाणे, दीपक निकंबे, वसंत पवार, विष्णु कारमपुरी, गोवर्धन संचू आदी उपस्थित होते. तर मालक संघाच्या वतीने जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, ॲड. विजय मराठे, मालक संघाचे अध्यक्ष सुनील छत्रिय, नितीन साबळे, बाळासाहेब जगदाळे आदींचा समावेश होता
Post Views: 97
Previous Post

बार्शीतील पिंपळवाडीत राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात; ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन

Next Post

भाजप युवा मोर्चा बार्शी शहराध्यक्षपदी अमोल डिसले 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
भाजप युवा मोर्चा बार्शी शहराध्यक्षपदी अमोल डिसले 

भाजप युवा मोर्चा बार्शी शहराध्यक्षपदी अमोल डिसले 

ताज्या बातम्या

शिक्षकेतरांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील….. चंद्रकांत पाटील

शिक्षकेतरांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील….. चंद्रकांत पाटील

October 21, 2026
अष्टमीदिनी पूर्व भागात घुमला तेलुगू लोकगीत  ‘ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो.

अष्टमीदिनी पूर्व भागात घुमला तेलुगू लोकगीत ‘ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो.

October 21, 2026
सामाजिक कार्यकर्ते अविनाश जेऊरकर आदर्श लोकप्रतिनिधी व समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते अविनाश जेऊरकर आदर्श लोकप्रतिनिधी व समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

October 21, 2026
धम्मचक्र प्रवर्तनदिन मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात उत्साहात  साजरा

धम्मचक्र प्रवर्तनदिन मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात उत्साहात  साजरा

October 21, 2026
बार्शीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उत्साहात

बार्शीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उत्साहात

October 21, 2026

आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने ७० विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे मार्गदर्शन

October 21, 2026
कोंडी आरोग्य केंद्रातील नवजात शिशू कक्ष पुन्हा सुरू; सुरक्षेसाठी निधी देणार – डॉ.माने

कोंडी आरोग्य केंद्रातील नवजात शिशू कक्ष पुन्हा सुरू; सुरक्षेसाठी निधी देणार – डॉ.माने

October 21, 2026
पानगल प्रशालेस इस्लामिक  एक्झिब्यूशन मध्ये यश

पानगल प्रशालेस इस्लामिक  एक्झिब्यूशन मध्ये यश

October 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1389823

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!