भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत नेते श्री चन्नवीर चिट्टे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराकडून हगलूर स्थित ‘संस्कृत संजीवनी अनाथ आश्रम’ येथील गरीब व अनाथ मुलांना एक वेळचे सुग्रास जेवण देऊन ‘अन्न सेवा समर्पण ‘ करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अतनूरे म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या समर्पित जीवनाचा आदर्श घेऊनच चन्नवीर चिट्टे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस अनाथ मुलांना जेवण देऊन खऱ्या अर्थाने सामाजिक पद्धतीने वाढदिवस साजरा केला चन्नवीर चिट्टे सरांनां कुठलेही राजकीय पद नसताना देखील सातत्याने विविध सेवाभावी उपक्रम घेत त्यांनी कार्यकर्त्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. सोलापूर स्विकृत नगरसेवक ज्ञानेश्वर म्यॅकम म्हणाले की मी गेली अनेक वर्षे चन्नवीर चिट्टे यांचं कार्य अगदी जवळून बघतोय. राजकारणाला समाजकारणची जोड कशी असावी याचा आदर्श म्हणजेच चन्नवीर चिट्टे. युवकांनी चिट्टे सरांच्यां कार्याचा आदर्श घेऊन असे सामाजिक उपक्रम राबवावे. चन्नवीर चिट्टे यांचं कौतुक करताना ते पुढे म्हणाले की समाजातील शेवटच्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम चन्नवीर चिट्टे व त्यांचा मित्र परिवार नेहमीच करत असतात आणि हे अगदी स्तुत्य , वाखाणण्याजोगं व अनुकरणीय असं आहे. चन्नवीर चिट्टे म्हणजे अत्यंत समर्पित कार्यकर्ता. गेली अनेक वर्षे ते अगदी निष्ठेने व हिरिहिरीने पक्षाचं काम करताहेत व त्यासोबतच सामाजिक कार्य देखील सातत्याने करतात. त्यांच्या या कार्याची आगामी काळात भारतीय जनता पक्ष नक्कीच दखल घेईल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी आभार मानताना संस्कृत संजीवनी आश्रमाचे परमेश्वर काळे यांनी चन्नवीर चिट्टें सारख्या व्यक्तीमुळेच मला अशा अनाथ मुलांची सेवा करण्याचं बळ मिळते असे सांगत कौतुक केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शशी अन्नलदास उपस्तिथ होते
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याण करजगी,श्रीनिवास दासरी, परमेश्वर क्षीरसागर, भीमाशंकर जमादार, रवी शहापुरकर, महेश हलसगी, सोमनाथ कलशेट्टी , सद्दाम कोसगीकर, धनराज चिंता , साईनाथ सज्जे आदीनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर आतनूरे यांनी केले.
Post Views: 22