पंढरपूर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या समर्पित जनसेवेच्या कार्यकाळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्ते अक्षय वाडकर यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराजवळ पश्चिमद्वार येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित केला..
दरम्यान १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून, देशसेवेची नवी दिशा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना नागरिकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद मिळण्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी भाजपा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा प्रभारी अक्षय वाडकर, अमर बाबर, नरसिंह परंडकर, अनिकेत मस्के, नचिकेत सांगोलकर, दिपक चव्हाण यांच्या सह तरुण कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 13