जेऊर – जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा करंजे (ता.करमाळा) ची विद्यार्थिनी कुमारी अन्वी संजय गर्जे इयत्ता सहावी हीची युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या बुद्धिबळ( under 14)या प्रकारात सोलापूर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून विभागस्तरीय स्पर्धेसाठी अन्वी ची निवड झालेली आहे, तिच्या चिकित्सक बुद्धीच्या जोरावर तिने सहा पैकी पाच मॅच जिंकून तिचे ग्रँड मास्टर बनण्याच्या स्वप्नाकडे पहिली वाटचाल दाखवून दिली आहे. त्यासाठी तिला तिचे वडील श्री संजय गर्जे सर व देशमुख सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. करंजे शाळेचे केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक , व इतर शिक्षक वृंद आदींनी तिचे कौतुक करून अन्वीला विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.