सोलापूर : विद्यार्थ्यांच्या जीवनात निरोगी आहार आणि योग्य आहार-विहाराच्या सवयी रुजविणे आवश्यक असून, विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. राघवेंद्र नादरगी यांनी केले.
राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त निमा सोलापूर अंगीकृत आयुर्वेद फोरम यांच्या वतीने विश्वकृपा विद्या प्रतिष्ठान, बाळे यांच्या सहकार्याने डी. व्ही. ढेपे प्रशाला, बाळे येथे विद्यार्थ्यांसाठी ‘आहाराचे शास्त्रोक्त महत्त्व व आहार-विहार’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी डॉ. नादरगी यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार, योग्य वेळेवर भोजन, पौष्टिक पदार्थांचे महत्त्व तसेच दैनंदिन दिनचर्येत आहार-विहाराचे पालन याबाबत आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या टाळण्यासाठी लहान वयापासूनच आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास निमा सेंट्रलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभूर्णीकर, निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जीड्डीमनी, खजिनदार डॉ. प्रवीण ननवरे, आयुर्वेद फोरमचे अध्यक्ष डॉ. महेशकुमार बिलुरे, निमा वुमन फोरमच्या डॉ. अश्विनी देगावकर, निमा स्टुडंट फोरमचे अध्यक्ष समर्थ वाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक अमोल ढेपे यांनी भूषविले तर सूत्रसंचालन सुजाता ढेपे यांनी केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























