जेऊर – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित(२०२६) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा करंजे तालुका करमाळा ची विद्यार्थिनी अन्वी संजय गर्जे इयत्ता पाचवी हिने३०० पैकी२६८ (८९.३३%) गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावून शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल अन्वी चे हार्दिक अभिनंदन. तिच्या या यशासाठी तिला तिचे वडील तसेच शिक्षक श्री संजय गर्जे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मानीय कदम साहेब विस्तार अधिकारी मा.टकले साहेब तसेच केंद्रप्रमुख मुंडे साहेब मुख्याध्यापक राऊत सर व इतर शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ आदींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.