श्रीपूर – येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यातील अधिकारी व कामगार वर्गानी मिळून सर्व कारखान्याची स्वच्छाता करून कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांना त्यांच्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली .
कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी संतोष कुमठेकर, प्रोडक्शन मॅनेजर एम . आर . कुलकर्णी , ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, परचेस मॅनेजर महेश देशपांडे, डिस्टलरी मॅनेजर आर . एस . पाटील,वर्क्स मॅनेजर अमोल बारटक्के, चिफ इंजिनियर सचिन विभूते, डे . चिफ केमिस्ट मिसाळ, उपासे, सुरक्षा अधिकारी सलगर कामगार प्रतिनिधी विजय पाटील यांच्या कल्पनेतून साकरलेल्या या उपक्रमा मळे सर्व कारखाना परिसर चकाचक झाला .
यात महत्वाची बाब म्हणजे अधिकारी वर्गाने कोणताही भेदभाव न करता स्वतः हातात झाडू घेवून स्वच्छता केली यास सर्व कामगारांनीही चांगली साथ दिली .
डॉ . यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस असल्याने त्याचे औचित्य साधत एक दिवस स्वच्छतेचा हा उपक्रम राबविला .
या बरोबरच पर्यावरणास अनुकुल कामगार वसहती मध्ये वृक्षारोपण करण्यात आले .
*क्रिडा स्पर्धांचे आयोजन*
डॉ . कुलकर्णी यांच्या वाढदिवसा निमित रविवार दि .५ जुलै रोजी पांडुरंग कामगार कल्याण मंडळ व पांडुरंग बॅडमिंटन क्लब च्या वतीने राज्य स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन अकलुज येथिल प्रसिध हृदयरोग तज्ञ डॉ . एम . के . इनामदार व प्रसिद्ध बॅडमिंटनपटू तुषार मुळे यांचे हस्ते होणार आहे .
तसेच जिगरबाज ग्रुपचे राजरत्न नाईकनवरे यांच्या वतीने राज्य स्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
संस्थेप्रति असणारे प्रेम समृद्धी देणारे.
वाढदिवस हे निमित्त असले तरी खाते प्रमख व कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेबाबत राबविलेला उपक्रम तसेच असणारे प्रेम संस्थेची भरभराट व सुख समृधी मिळवून देणारी बाब आहे .
. . .. … डॉ . यशवंत कुलकर्णी , कार्यकारी संचालक .
Post Views: 8