जेऊर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने यशवंत महाविद्यालय, करमाळा येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी अन्वी संजय गर्जे हिने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
अन्वीने आपल्या चिकित्सक बुद्धीचा आणि बुद्धिबळातील कौशल्याचा प्रभावी वापर करत पाच राऊंडपैकी तब्बल चार राऊंडमध्ये विजय मिळवला. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अन्वीला तिचे वडील संजय गर्जे सर तसेच पृथ्वीराज देशमुख सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. स्पर्धेनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अन्वीचा मेडल घालून सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
अन्वीच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक, मित्रपरिवार व क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.