मोडनिंब – पावसाअभावी सोलापूर जिल्ह्यात प्रमाण अत्यल्प राहिल्याने पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्याने जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनी ग्रामीण विकास व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच माढा तालुक्यातील तुळशी गावाचा सीना-माढा योजनेत समावेश करून योजनेतून गावातील पाझर तलाव भरून द्यावेत, सीना-माढा योजनेतून तुळशीलापाणी मिळावे, या मागणीसाठी ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत. सुप्रमा-३ ला मंजुरी देऊन तातडीने गावातील तलाव भरून द्यावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने कार्यवाही करावी,तसेच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिकांनी माना टाकल्या असून पशुधन वाचविण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे जळालेल्या पिकांचे पंचनामे, पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था, वीजबिल वसुलीस स्थगिती आणि कर्जवसुलीत सवलत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Post Views: 8