सांगोला – खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत २०२६-२७ च्या पहिल्या टप्प्यात ७.६९ कोटी रुपये खर्चाच्या सांगोला तालुक्यातील चार ग्रामीण रस्ते कामांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय ग्रामीण विकास व कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबतचे पत्र पाठवून मंजुरीची माहिती खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांना दिली आहे.
शेरीमळा ते एसएच-३८६ (एखतपूर), कोळवले वस्ती ते अजनाळे, कोळसेवस्ती ते व्हीआर-४६ (हंगीरगे), देशमुख-किसन साळगरे पाटीलवस्ती-गुंडीवस्ती ते व्हीआर-१३१ (कोळे) ह्या एकूण ६ कि.१३ मी रस्ते लांबीसाठी ७ कोटी ६९ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांना दिली. या रस्ते कामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि शेतीमाल वाहतुकीस मोठी चालना मिळणार असून ग्रामीण विकासाला गती मिळणार आहे.
फोटो-
खा.धैर्यशील मोहिते-पाटील
Post Views: 8