भोकरदन : भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील समाजाला हक्काचे घर मिळावे यासाठी राज्यसरकारच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. सन 2023-2024 च्या अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये राज्यसरकारने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 600 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे.
माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या दुरदृष्टीतुन आणि आमदार संतोष पाटील दानवे व आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नामुळे भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील नागरीकांसाठी भोकरदन तालुक्यामध्ये 892 तर जाफ्राबाद तालुक्यामध्ये 504 असे एकुण 1396 घरकुलांना मुंजरी मिळालेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील बांधवांचे जीवनमान उंचावणार असुन त्यांना हक्काचे घर मिळणार आहे.
भोकरदन तालुक्यामध्ये सन 2017 ते 2023 दरम्यान इतर समाज घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजने अंतर्गंत 6699 लाभाथ्र्यांना घरकुल मंजुर झाले असुन त्यापैकी 5631 लाभाथ्र्यांनी घराचे बांधकाम पूर्ण देखील केले आहे. भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातील सर्वच समाजातील मागास घटकांना हक्काचे घर मिळावे यासाठी तालुक्या चा लोकप्रतिनिधी या नात्याने सतत पाठपुरवा करणार असल्याची ग्वाही आमदार संतोष पाटील दानवे यांनी वेळी दिली.