आमच्या विरुद्ध सी पी ऑफिस येथे तक्रार का दिली म्हणून लोखंडी सळईने मारहाण – महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल
सोलापूर: “तुम्ही सर्वांनी मिळून आमच्याविरुद्ध सी. पी. ऑफिस येथे तक्रार का दिली?” या कारणावरून वाद घालत एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याची घटना बेगमपेठ भागात १७ मे रोजी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघाजनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अकिब कुरेशी, रेहान बिलाल , जुनेद बिलाल कुरेशी आणि हबीबा कुरेशी ( रा. बेगम पेठ, सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत बुन्हानोद्दीन शरिफसाब कुरेशी ( रा. १८४, बेगमपेठ, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी हे १७ मे रोजी वाडयात असताना त्यांचा चुलत भाऊ म्हणजे यातील आरोपी अकिब कुरेशी याने फिर्यादीस घराबाहेर बोलावून घेऊन तुम्ही सर्वजण मिळुन आमचेविरुध्द सी पी ऑफिस येथे तक्रार का दिलात या कारणावरून शिवीगाळ करुन हाताने चापट मारली व यावेळी आरोपी रेहान बिलाल याने सळईने फिर्यादीचे तोंडावर मारुन जखमी केले आहे. तसेच आरोपी महिला हबीबा हिने फिर्यादीचे शर्टाची कॉलर पकडुन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार कांबळे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
नई जिंदगी भागात तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला -एकावर गुन्हा दाखल
सोलापूर : ‘आमच्या गाडीला कट मारू नका’ असे समजावून सांगणाऱ्या एका दुचाकीस्वार तरुणावर आणि त्याच्या भावावर चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना नई जिंदगी परिसरातील आयेशा फंक्शन हॉलजवळ १७ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अब्दुल ईस्माईल कसाब (रा नई जिंदगी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत फरदीन मुकंदर काझी (रा. टिळक नगर, मजरेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी हे रविवारी रात्री साडेआठ वाजता आई शहनाज, भाऊ आतिफ असे मिळून दुचाकीवरुन असताना नई जिंदगी भागातील मा आयेशा फंक्शन हॉल जवळ वरील आरोपीं मागुन येवून वाहनाला कट मारुन पुढे येवून थांबला .तेव्हा फिर्यादीने त्याला गाडी को कट मत मार , गाडीपर अम्मी और भाई बैठा है . गिरे तो उनको मार लगेगा असे समजावून सांगत असताना आरोपीने फिर्यादीलाच धमकावत हाताने चापट मारली व त्याचे अंगातील शर्टात लपवून ठेवलेले लोखंडी चॉपर हत्यार काढुन फिर्यादीच्या खांदयावर मारले व भाऊ आतिफ यास पोटात वार करुन जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार नकाते हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 8