पंढरपूर – महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर नगरीतअधिक महिन्या निमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत असताना मंदिर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी महिलांच्या सुलभ स्वच्छालयात चोरून व्हिडिओ शूटिंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
नुकताच महाद्वार परिसरातील महिलांच्या सुलभ स्वच्छालयात काल एका अज्ञात इसमाने महिलेचे चोरून शूटिंग करत असताना नागरिकांनीत्याला पकडून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर संबंधितावर पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला. मात्र ही घटना ताजी असतानाच पुन्हा आज विठ्ठल मंदिरपरिसरातील नामदेव पायरी शेजारील महिलांच्या सुलभ स्वच्छालयात असाच संतापजनक प्रकारघडला. या प्रकारा
बाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेला स्वच्छतालया मध्ये संशयास्पद हालचाल जाणवली. त्यावेळी तिने वरती एकामुलाचे डोके पाहताच आरडाओरड सुरू केली. महिलेने त्या संशयिताला पकडण्याचा प्रयत्नकेला, मात्र तो इसमघटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर संबंधित महिलेने तीव्रसंताप व्यक्त करत मंदिर परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. सलगघडणाऱ्या या घटनांमुळे येथील मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आलीअसून भाविक महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
———————
चौकट : ( अधिकृत तक्रार केली दाखल : विक्रम शिरसट )
दरम्यान कालच्या घटनेतील पुणे येथील पीडित महिलेने घडलेल्या प्रकारा बाबत आपल्याशी संपर्क साधुन पोलिसांकडे अधिकृत तक्रार दिल्याचेही आपल्याला सांगितल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्तेतथा माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी सांगितले.
—————
कोट
“मंदिर परिसरातील महिलांच्या सर्व सुलभ स्वच्छतालयांची सुरक्षितता तातडीने वाढवावी, बंदिस्त आणि सुरक्षित स्वच्छतालय उभारावीत, अन्यथा पालिकाप्रशासना विरोधात तीव्रआंदोलन छेडले जाईल,”
विक्रम शिरसट (सामाजिक कार्यकर्ता तथा माजी नगरसेवक )
Post Views: 10