पोलिसात केस का केली म्हणून एकास दगड व लाथा बुक्क्यांनी मारहाण
सोलापूर – पोलिसात केस का केली या कारणावरून एका व्यक्तीला दगड व लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना मोदी रेल्वे बोगद्याजवळ रविवारी मध्यरात्री घडली .
राम हनुमंत जाधव (वय 51 वर्ष , रा. सेटलमेंट फ्री कॉलनी सहा , सोलापूर) असे त्या जखमी व्यक्तीचे नाव आहे .रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मोदी रेल्वे बोगदा जवळ असताना त्याला आदी नायडू ,अक्षय नायडू इतर दोन जणांनी मिळून दगड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . यात डोक्याला जखम व हाताला मार लागल्याने त्याला उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात ओंकार जाधव यांनी मध्यरात्री दाखल केले .
लहान मुलांच्या वादावरून काचेची बाटली व चाकूने मारहाण : दोघे तरुण जखमी
सोलापूर – लहान मुलांच्या वादावरून काचेची बाटली व चाकूने मारहाण करून दोघा तरुणांना जखमी करण्यात आल्याची घटना सात रस्ता भागातील , भंगी गल्ली , इमामबाडा येथे रविवारी रात्री दहा वाजता घडली .
आफान मुस्ताक शेख (वय 23 वर्ष ) आणि अमन रफिक शेख ( वय 25 वर्ष , दोघे रा. इमाम बाडा , दक्षिण सदर बाजार सोलापूर ) अशी जखमींची नावे असून ते दोघे रविवार रात्री घराजवळ असताना त्यांना समीर इनामदार , अहमद इनामदार व इतर सहा जणांनी मिळून मारहाण केली . यात दोघे मार लागून जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात फैजल शेख याने मध्यरात्री दाखल केले .
तलावातील मास्यांना खाण्यासाठी पाव टाकताना एकाला सर्पदंंश
सोलापूर – तलावातील मास्यांना खाण्यासाठी पाव टाकत असताना उजव्या हाताला सापाने दंश केल्याची घटना कंबर तलाव तेथे रविवारी सायंकाळी घडली .
जैद रहमतुल्ला शेख ( वय 39 वर्ष,रा.नई जिंदगी , सितारा चौक सोलापूर) असे त्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो रविवारी सायंकाळी चार वाजता कंबर तलाव येथे बसून मास्यांना खाण्यासाठी पाव टाकत होता . त्यावेळी त्याच्या उजव्या हाताला एका सापाने चावा घेतला . त्यामुळे त्याला उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईक उबेद मुजावर यांनी सायंकाळी दाखल केले .
दुचाकी स्लिप होऊन जखमी झालेल्या औंढी गावच्या व्यक्तीचा अखेर मृत्यू
.
सोलापूर – दुचाकी स्लीप होऊन जखमी झालेल्या औंढी गावच्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज सोमवारी सकाळी 11 वाजता मृत्यू झाला .
वसंत शिवाजी सूर्यवंशी (वय 45 वर्षे , रा. औंढी , ता.जत , जिल्हा सांगली) असे त्या मयत दुचाकीस्वाराचे नाव असून ते 18 मे रोजी संध्याकाळी बुध्याळ ते सोनल गावाकडे दुचाकी वरून निघाले असताना सांगोला येथील मानेगाव जवळ त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते जखमी झाले होते . त्यांना सांगोल्याच्या एका खाजगी दवाखान्यात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात भाऊ बाबासो सूर्यवंशी यांनी पहाटे दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला .
Post Views: 3