इब्रामपूर येथे शेती वादतून कोयता व चाकूने हल्ला – शेतकरी जखमी
सोलापूर – शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याला कोयता ,चाकू व लाथा बुक्क्यांनी मारून जखमी करण्यात आल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील इब्रामपूर येथे आज रविवारी दुपारी दोन वाजता घडली.
मलकण्णा बरून्ना बबलाद (वय 40 वर्ष , रा. इब्रामपूर ) असे त्या जखमी शेतकऱ्याचे नाव असून आज रविवारी दुपारी ते शेतामध्ये असताना शेतीच्या वादातून त्यांना महादेव बबलाद, भागेश बबलाद व इतर एक जणांनी मिळून कोयता , चाकू व लाथा बुक्क्याने मारहाण केली . यात डोक्याला व हाताला जखम व सर्व अंगाला मुकामार लागल्याने त्यांना अक्कलकोटच्या आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून येथील शासकीय रुग्णालयात सायंकाळी पाच वाजता दाखल करण्यात आले .
कामावर लेट का आली म्हणून शेतमजूर महिलेस दुचाकीच्या चैनने मारहाण
सोलापूर – शेतामध्ये कामाला लेट का आलीस म्हणून एका शेतमजूर महिलेस मोटरसायकलच्या चैनने मारहाण करण्यात आल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट येथे शनिवारी दुपारी घडली .
सुनिता राजू साबळे (वय 35 वर्ष , रा. कुरघोट ) असे त्या मारहाण झालेल्या मजूर महिलेचे नाव आहे . शनिवारी दुपारी बारा वाजता त्या कामासाठी शेतामध्ये आले असता त्यांना लेट का आलीस म्हणून पद्मावती अन्नप्पा बनसोडे , विजय अण्णा बनसोडे यांनी मिळून मारहाण केली . सर्व अंगाला मुकामार लागल्याने त्यांना मंद्रूपच्या आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून येथील शासकीय रुग्णालयात ती दुपारी स्वतः दाखल झाली .
Post Views: 10