Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रात्रभर रांगेत अडकले हजारो वारकरी; पंढरपूरातील दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप

तरुण भारतbyतरुण भारत
May 25, 2026
in west maharashtra
0
रात्रभर रांगेत अडकले हजारो वारकरी; पंढरपूरातील दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – सध्या सुरु असलेल्या अधिक मासामुळे पंढरपूरमध्ये श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येथे दाखल होत आहेत. भक्तिभावाने ओथंबलेल्या या गर्दीत एकीकडे विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि पंढरीच्या ओढीने भरलेले वातावरण दिसत असले. तरी दुसरीकडे रात्रीच्या वेळी दर्शन रांगेतील वास्तव अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी शनिवारी (ता.२३) पत्राशेड परिसरात दुपारी चार वाजता दर्शन रांगेत दाखल झालेल्या भाविकांना रात्री साडेदहा वाजता मंदिर बंद झाल्याने रांग तेथेच थांबवण्यात आली. त्या वेळी रांगेत हजारो भाविक होते. मंदिर बंद झाल्यानंतरही या भक्तांना सकाळी सहा वाजेपर्यंत त्याच रांगेत थांबावे लागणार होते. विशेष म्हणजे, रांगेतून बाहेर पडले तर पुन्हा दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी सुरुवाती पासूनच, म्हणजे पत्राशेडपासून उभे राहावे लागेल.या भीतीने अनेक भाविकांनी संपूर्ण रात्र तिथेच काढण्याचा निर्णय घेतला. या काळातच पावसाने देखील भाविकांची तारांबळ उडाली. मात्र अशा परिस्थितीत देखील रांगेतील भाविक केवळ विठ्ठलाच्या दर्शनाच्या आशेवर ताटकळत उभे असल्याचे दिसत होते.
—————

सर्वात आश्चर्याचीबाब म्हणजे या संपूर्ण अडीच ते तीन किलोमीटर परिसरात मंदिर समितीच्या वतीने कुठेही पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक होमगार्ड किंवा पोलिस प्रशासनाचे अधिकारी दिसून आले नाहीत.
—————–
चौकट : ( आषाढी, कार्तिकी प्रमाणे अधिकमासाचे नियोजन करावे) अनेक वारकऱ्यांनी एकमुखाने अशी मागणी केली की दर्शन रांग रात्री बंद न करता ती चोविस तास सुरु करणे. त्यांचा मुद्दा अतिशय साधा पण महत्त्वाचा आहेः वर्षातून भरणाऱ्या आषाढी व कार्तिकी यात्रांमध्ये ज्या प्रकारे अनेकदा १५ दिवस दर्शन २४ तास सुरु असते. त्याचप्रमाणे अधिक मासातही लाखो भाविकांची गर्दी असताना रांग रात्री साडेदहा ते सकाळी सहा बंद ठेवण्याचे कारण काय असा संतप्त सवाल देखील भाविकांमधून उपस्थित केला जात होता.
—————-

भाविकांच्या मते, जर दर्शन रांग अखंड सुरु राहिली. तर लोक योग्य वेळेत दर्शन घेऊन आपल्या निवाऱ्याच्या ठिकाणी परतू शकतील. त्यामुळे रांगेत तासन्‌तास अडकून राहण्याची वेळ येणार नाही. लहान मुले. वृद्ध महिला आणि बाहेरगावाहून आलेल्या भक्तांना याचा मोठा दिलासा मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भक्तीबरोबरच माणुसकी आणि व्यवस्थापन याचा समतोल राखला जाईल. ही मागणी केवळ सोयीसाठी नाही, तर ती गरजेची आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविक येत असताना रात्रभर दर्शन रांग बंद ठेवणे, आणि मग तिथेच हजारो लोकांना अत्यंत असुविधाजनक परिस्थितीत अडकवून ठेवणे, हे योग्य नियोजनाचे लक्षण नाही.
—————–

भाविकांच्या श्रद्धेला शिस्त आणि व्यवस्थेला संवेदनशीलता जोडली गेली तरच पंढरपूरची परंपरा अधिक उज्ज्वल होईल. अन्यथा अशा प्रसंगांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक ठरेल. पंढरपूर हे केवळ एक मंदिर नाही, तर लाखो वारक-यांच्या भावनांचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच भाविकांच्या अपेक्षा, त्यांच्या सोयी आणि त्यांची सुरक्षितता याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
—————–

पदस्पर्श दर्शन रांगे मध्ये थांबलेल्या या वारकऱ्यांवर निसर्गानेही जणू दुसरा आघात केला. साधारण रात्री अकराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली वर फक्त पांढऱ्या कापडाचे छप्पर होतेः परंतु त्या छपरातूनही पावसाचे थेंब अंगावर पडत होते. खाली पाणी साचून संपूर्ण परिसर चिखलमय आणि ओला झाला. अशा भिजलेल्या, दमट आणि अस्वस्थ करणाऱ्या वातावरणातच भाविकांनी जागेवर बसणे, आड़वे होणे किवा थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी ना पावसापासून पुरेशी आडोसा व्यवस्था, ना जमिनीवर बसण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित जागा, ना झोपण्यासाठी किमान सुविधा उपलब्ध होत्या. या दर्शन रांगेत डासांचा त्रास, पावसाचा मार, वाऱ्याचा झोत आणि दमट वातावरण यांचा सामना करावा लागला.
—————–

दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची उपलब्धता वैद्यकीय मदत, गर्दी नियंत्रणासाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्शन रांगेचे २४ तास नियोजनबद्ध संचालन या बाबी आता केवळ सूचना न राहता तातडीच्या गरजा बनल्या आहेत. अधिक मासातील हा अनुभव प्रशासनासाठी एक इशारा आहे. श्रद्धेच्या या प्रचंड लाटेला योग्य व्यवस्थापनाची किनार न दिल्यास भाविकांच्या मनात असंतोष निर्माण होतो. पण जर वेळेवर आणि संवेदनशील निर्णय घेतला गेला, तर पंढरपूरचे दर्शन अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी संस्मरणीय ठरु शकते. वारकऱ्यांची एकच अपेक्षा आहे. विठ्ठलाच्या दर्शनाचा मार्ग सुविधांनी समृद्ध असावा, आणि दर्शनासाठी उभा राहणारा प्रत्येक भक्त सन्मानाने, सुरक्षितपणे आणि सुलभतेने दर्शन घेऊन परत आपल्या गावी जावा.

Post Views: 28
Previous Post

शेती वादतून कोयता व चाकूने हल्ला; कामावर लेट का आली म्हणून महिलेस मारहाण

Next Post

चित्रकार जितेश मोरे साकारणार “शिवबा” चित्रमालिका  

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

चित्रकार जितेश मोरे साकारणार “शिवबा” चित्रमालिका  

ताज्या बातम्या

रंगभवन जवळचा छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा आता येता जाता दिसणार सोलापूरकराना #solapurnews #marathinews

June 7, 2026

अखेर देवस्थान अधिनियम निर्मूलन कायदा प्रारूपास सरकारने दिली स्थगिती #marathinews #maharashtranews

June 7, 2026

सोलापूरच्या मिलिंद थोबडेंची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी हॅट्रिक #solapurnews #marathinews

June 7, 2026

गोवा हैद्राबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद पण सप्टेंबर मध्ये नियमित सेवा #solapurnews

June 7, 2026

वा क्या बात है ……ड्रोनची मदत घेत पोलिसांनी मुळेगाव तांड्यातील अवैद्य दारू अडड्यांना केले उध्वस्त

June 7, 2026

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0898373

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697