सोलापूर : बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी 770 शरणांना घेऊन अनुभव मंडपाची स्थापना केली. त्या 770 शरणांमध्ये 700 पुरुष होते तर 70 स्त्रीशरणी होत्या. हीच स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी केली असे प्रतिपादन प्रा. अपेक्षा चाकोते (मुंबई) यांनी केले.
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनच्यावतीने आयोजित केलेल्या बसव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना चाकोते बोलत होते. ‘स्त्री स्वातंत्र्याचे उद्गाते : महात्मा बसवेश्वर’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, जनता सहकारी बँकेच्या संचालिका चंद्रिका चव्हाण, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुचित्रा थळंगे, वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आशा पाटील व सचिवा माधुरी बिराजदार उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार, प्रा. डॉ.चंद्रकांत चव्हाण, प्रा. डॉ. संजय नीला, वीरेंद्र हिंगमिरे, बाबा बाबरे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, आनंद दुलंगे, संजय साखरे, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, राजेश नीला, मनोज पाटील, योगेश कापसे, रेश्मा निडगुंदी आदी उपस्थित होते.

























