Wednesday, November 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टेलिग्राम, व्हॉट्सॲप ग्रुपच्या सल्ल्याने शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सावधान, NSE ने केलं सतर्क!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 18, 2024
in india
0
टेलिग्राम, व्हॉट्सॲप ग्रुपच्या सल्ल्याने शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सावधान, NSE ने केलं सतर्क!
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेअर बाजारात दिवसेंदिवस गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज अनेकजण या क्षेत्रात येतात आणि पैशांची गुंतवणूक करतात. सुरुवातीला पैसे कसे गुंतवायचे हे माहिती नसल्यामुळे अनेकजण या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतात. मात्र कधीकधी अशा नवख्या लोकांची मोठी फसवणूक होते. चुकीच्या व्यक्तीकडून मिळालेल्या सल्ल्यांमुळे अनेकांचे कोट्यवधी रुपये बुडतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. याविषयी आता शेअर बाजारातील फसवणूक रोखण्यासाठी राष्ट्रीय शेअऱ बाजाराने गुंतवणूकदारांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर ग्रुपवर मिलणाऱ्या गुंतवणुकीच्या सल्ल्यांवर विश्वास ठेवू नये, असे राष्ट्रीय शेअर बाजाराने सांगितले आहे.

एनएसईने गुंतवणूकदारांना दिला महत्त्वाचा सल्ला

एनएसईने गुतवणूकदारांना डब्बा ट्रेडिंग किंवा अवैध ट्रेडिंगविषयी सतर्क केले आहे. इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर असे अनेक ग्रुप आहेत, जे गुंतवणुकीचा सल्ला देतात. तसेच अमूक कंपनीत गुंतवणूक केल्यामुळे अमूक फायदा झाला, असा दावादेखील या ग्रुपवर केला जातो. यासंदर्भाताच एनएसईने गुंतवणूकदारांना सतर्क केले आहे. अशा प्रकारे मिळणाऱ्या सल्ल्यांपासून दूर राहा. या सल्ल्यांची अंमलबजावणी करू नका, असे एनएसईने म्हटले आहे. एनएसईने इन्स्टाग्रावरील बीएसई एनएसई लेटेस्ट (bse_nse_latest) आणि टेलिग्राम वर भारत टार्डिंग यात्रा (BHARAT TARDING YATRA) या ग्रुप्सबाबत लोकांना सतर्क केले आहे. या चॅनल्सकडून सिक्योरिटिज मार्केटवर ट्रेडिंगचा आणि ट्रेडिंग अकाऊंट मॅनेजमेंटचा सल्ला दिला जातो.

गॅरंटिड रिटर्न्स देणाऱ्याचा दावा करणाऱ्यांपासून राहा दूर

राष्ट्रीय शेअर बाजाराने परताव्याची हमी देण्याचा दावा करणाऱ्यांपासून दूर राहावे, असेही गुंतवणूकदारांना सांगितले आहे. तसेच गुंतवणूकदारांनी आपला पासवर्ड आणि यूजर आयडी कोणालाही देऊ नये, कोणाशीही तो शेअर करू नये, असाही सल्ला एनएसईने दिला आहे. एनएसईकडून वेळोवेळी अवैधरित्या ट्रेडिंग करणाऱ्या संस्थांच्या मोबाईल क्रमांकाविषयीही माहिती दिली जाते.

नोंदणीकृत सदस्यांची माहिती कशी मिळवायची?

गुंतवणुकीचा सल्ला देणारी व्यक्ती, संस्था कोण आहे हे सामान्य गुंतवणूकदारांना माहिती नसते. मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर या सल्लागारांची माहिती मिळू शकते. त्यासाठी www.nseindia.com/invest/find-a-stock-broker या लिकंवर जाऊन रजिस्टर्ड मेंबर्सची माहिती मिळवता येते.

Post Views: 58
Previous Post

लोकप्रियतेसाठीच मंत्री घोषणा करतात, मुलींना मोफत शिक्षणाच्या मुद्यावरुन सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

Next Post

विधानसभेची रणधुमाळी, मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विधानसभेची रणधुमाळी, मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

विधानसभेची रणधुमाळी, मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

ताज्या बातम्या

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत१० उमेदवारांचे अर्ज बाद..

November 3, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026
५ नोव्हेंबरला अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली ग्रंथालय उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण

५ नोव्हेंबरला अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली ग्रंथालय उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण

November 2, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे चषक २०२६ क्रिकेट स्पर्धा थाटात संपन्न; ४०१६ क्रिकेट क्लब पंढरपूर ठरला विजेता

पालकमंत्री जयकुमार गोरे चषक २०२६ क्रिकेट स्पर्धा थाटात संपन्न; ४०१६ क्रिकेट क्लब पंढरपूर ठरला विजेता

November 2, 2026
प्रताप आसबे यांच्या रूपाने निर्भीड पत्रकार हरपला 

प्रताप आसबे यांच्या रूपाने निर्भीड पत्रकार हरपला 

November 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1462622

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!