Saturday, June 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वारकरी दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाचे सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

तरुण भारतbyतरुण भारत
May 10, 2026
in editor
0
वारकरी दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाचे सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्यादर्शनरांगेत दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्थाव्हावी, यासाठी १२९ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता.  त्या कामाचे भूमिपूजन येत्या सोमवारी (ता.११) सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती विठ्ठल  रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी दर्शनरांगेत पत्राशेड येथे आले होते. त्यावेळी त्यांना दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी निधीउपलब्ध करून देणेबाबत मंदिर समितीचा सहअध्यक्ष या नात्याने मंदिर समितीच्या वतीनेगहिनीनाथ महाराज औसेकर विनंती केली होती. त्या नंतरराज्य शासनाच्या पुढाकारातून हा दर्शनमंडप आणि स्कायवाँकचे काम हाती घेण्यात आलेलेआहे.  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांबाबतचे प्रस्ताव तयार करून शासनास तात्काळ सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी, सोलापूर यांना दिले होते. तत्कालिन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घेऊन, शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यास उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन रूपये १२९.४९ कोटीचा आराखडा राज्य शिखर समिती समोर सादर केला होता. 

असोसिएटस यांना ठेका ) याआराखड्यास शिखर समितीने मंजुरी देऊन दि.११ऑक्टोंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करून १३ कोटीचा निधी वितरीत केला होता. तद्नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विहित प्रक्रिया राबवून इंटरफेस डिझाईन असोसिएटस, पुणेयांना याकामाचा ठेकादिला आहे. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन येत्या आषाढी यात्रेपर्यंत याचे जवळपास साठते ऐंशी टक्के काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली. 

 या स्कायवॉकची लांबी – १०५० मी, रुं दी – २.४ मीटर आणि  उंची – ४ मीटर असूनतो  जमिनीपासून  ७ मीटर ऐवढ्या उंचीवर असणारआहे.पत्राशेडपासून पूर्व दरवाजापर्यंत – केवळ Transitसाठी असणार आहे, यामध्ये भाविक थांबणार नाहीत. जमिनीपासून ४ मीटर उंचीवर बांधण्यात येणार आहे. भाविकांना विश्रांती म्हणून १०५० मीटर लांबीच्या स्कायवॉकमध्ये तीन विश्रांती क्षेत्रांची तरतूद. आपत्कालीन परिस्थितीत वारकऱ्यांनाबाहेर काढण्यासाठी सहा ठिकाणी जिन्यांची व्यवस्था. चंद्रभागा घाट, श्री राम मंदिर आणि कुंभार घाट  असे तीन ठिकाणी प्रसाधनगृहे प्रस्तावितआहेत. पब्लिक अड्रेस सिस्टिम, सिक्युरीटी एरीया, प्रथमोपचार सुविधा, प्रकाश व वायुविजन व्यवस्था, स्ट्रक्चरल स्टील मधील बांधकाम त्यामुळे काम गतीने पुर्ण होणार. 

सद्यस्थीतील पायाभूत सुविधांवरचा ताण कमी करण्यासाठी व गतीने स्कायवॉकचे बांधकाम करण्यासाठीस्टील स्ट्रक्चरचा वापर प्रस्तावित करण्यात आला आहे. पावसाचे पाणीशिरण्यापासून रोखण्यासाठी स्कायवॉकचे छत १.५ मीटर ओव्हरहँग प्रस्तावित आहे.

भाग१ दर्शन रांगेसाठी स्कायवॉक (उन्नतमार्ग), १०५० मी.लांब, २ मी रुंद, ३ मी.उंच, मुलभूत सुविधा, ईतर मुलभूत सुविधा. स्टील्ट फ्लोअर ४ मी. उंचीवर बांधण्यातयेणार,  लीफटस, रॅम्प्स, लॉकर्स, आपतकालीन परिस्थितीत वारकऱ्यांना बाहेरकाढण्यासाठी सहा ठिकाणी स्टेअर केसीस , पावसाचेपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेन पाईप्स, गटर्सव जमीनीला प्रापर उतार.

 —————————

चौकट : ( ग्राउंड फ्लोअरवर मेडीकल फॅसिलीटीस ) ग्राउंडफ्लो
अर : मेडीकल फॅसिलीटीस – मेल फिमेल वार्ड प्रत्येकी १० बेड्स, सिक्युरीटी एरीया, लॉकर्स,  चार मोठया लिफ्ट्स ( १० फुट बाय साडेसहा फुट ) व दोन लहान लिफ्ट्स, अन्नछत्र८०० चौ. फुट, भोजनालय १५० व्यक्तीकरीता, स्टोअर्स, आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहे, फायर शाफटस.

————————

चौकट :  ( एकुण चार मजल्यांचा असणार
दर्शनमंडप ) 
दर्शनमंडप –
क्षेत्रफळ – १६१८५ चौमी, स्टील्टमजला -५८१७ चौमी,तळमजला- ४९२३ चौ मी, पहिला मजला – ४९२३ चौ मी, दुसरा मजला-५२२ चौ मी. प्रत्येक मजल्याचे वैशिष्ठ आणि वारकरी क्षमता : स्टील्ट मजला उंची – ४ मी क्षमता -६००० भाविक. फस्ट, सेकंड व थर्ड फ्लोअर : एका मजल्यावर २००० वारकरी बसु शकतील असा दर्शनमंडप. 

———————

चौकट : ( दर्शनमंडपातील उपलब्ध सुविधा ) 

आपतकालीन परिस्थितीसाठी दर्शन रांग मधेच काढता येण्याची सोय, प्रत्येक मजल्यावर २४ मेल फिमेल टॉयलेटस, युरीनल्स, वॉश बेसीन्स, सिक्युरीटीएरीया, चार वेगवेगळया ठिकाणी चहा नाश्त्याची सोय, आठ वेगवेगळया ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय,  पब्लिक अड्रेस सिस्टिम, प्रथमोपचारसुविधा, हिरकणी कक्ष, प्रकाश व वायुविजन व्यवस्था

———————

चौकट : ( प्रत्येकमजल्याचे स्पेसीफिकेशन ) स्टील्टमजला :-जमिनीच्या सपाटीपासून ४ मीटर उंचीवर, ४-स्ट्रेचर लिफ्टची तरतूद, वारकऱ्यांना सहज बाहेर काढण्यासाठी ४जिन्यांची व २ रॅम्पची सोय,पूर/वादळाचे पाणी, सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजव्यवस्थापहिलाव दुसरा मजला :- पास स्कॅनिंग काउंटर्स संख्या- ३०इतकी,या शिवाय १५०० क्षमते
चे २ सभागृहे, प्रत्येक मजल्यावर (एकूण क्षमता- ६००० व्यक्तींसाठी), तातडीची वैद्यकीय सुविधा, आयसीयू २ बेड, १० सामान्य बेड, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, विद्युत व्यवस्था कक्ष, प्रशासकीय कार्यालय, १० X ६.५० फुट आकाराच्या चार स्ट्रेचर लिफ्ट आणि इतर २ लिफ्ट, अल्पोपहार काऊंटर व किचन, स्त्री, पुरुष व दिव्यांगांसाठी शौचालये. वारकरीदर्शन मंडप क्षेत्र  :- १४६०० चौरस.मी ( जी + ४ मजला), आकार – ७१ मी x ४५मी )
, क्षमता:- ६००० भाविक, जमीनीपासून ४ मी.उंचीवर प्रकल्प सुविधा – शौचालय, पिण्याचेपाणी, दर्शन सभागृह, अल्पोपहार काऊंटर, तातडीची वैद्यकीय सुविधा, हिरकणी कक्ष, मास एंट्री स्क्रीनिंग सिस्टम, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार सुविधा. 

——————–

चौकट : ( प्रकल्प पुर्णझाल्यावर देणार मंदिर समितीच्या ताब्यात ) या नियोजित प्रकल्पाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभालीची तसेच इतर अनुषंगीक कामांची जबाबदारी व कार्यान्वयीन यंत्रणा ही श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावर असणार आहे. 

Post Views: 42
Previous Post

१५ ते १७ मे रोजी दरम्यान रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव

Next Post

“पैशांचा पाऊस पाडतो” म्हणत लाखोंची फसवणूक; भोंदू महाराजांसह भावाला ठोकल्या बेड्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
“पैशांचा पाऊस पाडतो” म्हणत लाखोंची फसवणूक; भोंदू महाराजांसह भावाला ठोकल्या बेड्या

“पैशांचा पाऊस पाडतो” म्हणत लाखोंची फसवणूक; भोंदू महाराजांसह भावाला ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

नाईट लँडिंगचे कारण नको विमानसेवा सुरळीत ठेवा – जिल्हाधिकारी #viral #news #solapurnews

June 27, 2026

म्हणून उडत नाहीये सोलापूरातून विमान….. #viral #news #solapurnews

June 27, 2026

केतनचे परिवार भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय

June 27, 2026

दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनाचा खर्च रु १४५ ११ कोटी #viral #news #solapurnews

June 27, 2026

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आत्मचिंतनाची गरज #news #marathinews

June 27, 2026

टी ई टी परीक्षेचा पेपर फुटला #viral #news #breakingnews

June 27, 2026

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींनी जे घडलं ते थेट सांगितले….. #viral #marathinews #news

June 27, 2026

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0942635

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697