मोडनिंब – मोडनिंब (ता. माढा) येथे संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या विचारातून प्रेरणा घेत शिवशंभो गणेश तरुण मंडळ (गोलावरचा राजा) आणि रोटरी क्लब मोडनिंब यांच्या वतीने रविवारी येथील ऐतिहासिक राजवाडा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रोटरी क्लबचे सदस्य तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते, सुजाज नागरिक सहभागी झाले. परिसरातील स्वच्छता करून कचरा काढण्यात आला. अस्वच्छता दूर करून ऐतिहासिक वास्तूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न तरुणाकडून करण्यात आला. राजवाडा तासेच परिसरात अस्वच्छता वाढत असतानाही स्थानिक प्रशासन याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. अखेर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत परिसराची स्वच्छता केली. ऐतिहासिक वास्तू असलेल्या राजवाड्याच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छता राखावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी मुन्ना जाधव, महेश लादे, रोटरी क्लबचे डॉ. प्रशांत कोल्हे, अनिल शिंदे, संतोष लादे, सुधीर लादे, तुषार ढोबळे, रोहन ढोबळे, सिद्धेश्वर लादे, अजय शिंदे, प्रवीण लादे, हर्षल लादे, माऊली लादे, वेदांत महामुनी, वेदांत लादे, संपत महामुनी,किरण तोडकर, निलेश गिड्डे, बालाजी लादे यासह पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव सामाजिक उपक्रमातून समाजाला चांगला संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमातून स्वच्छतेचा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे शिवशंभो गणेश तरुण मंडळ पदाधिकार्यांनी सांगितले.























